Agriculture news in marathi; Medical Officers Workshop on Amravati Division for the treatment of poisoning | Agrowon

विषबाधितांवरील उपचाराबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

अकोला  ः कृषी विभाग, जिल्हा परिषद व सिंजेंटा इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येथे कीटकनाशके फवारताना विषबाधित झालेल्या शेतकरी, शेतमजूर यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन सभागृहात अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.

अकोला  ः कृषी विभाग, जिल्हा परिषद व सिंजेंटा इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येथे कीटकनाशके फवारताना विषबाधित झालेल्या शेतकरी, शेतमजूर यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन सभागृहात अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. फारूखी, कोचिन येथून आलेले प्रमुख मार्गदर्शक डॉ.  व्ही. व्ही. पिल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मोरे आदी अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेत अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यांतील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.

या वेळी मार्गदर्शन करताना पापळकर म्हणाले, की कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची खबरदारी व दक्षता याबाबत शासन जनजागृती करीत आहे. तथापि विषबाधेच्या घटना होत असताना बाधितांवरील उपचाराबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकारी या संदर्भात अत्याधुनिक उपचारपद्धतीबाबत अवगत असावेत. कारण विषबाधेनंतर प्रथम उपचार गावातील आरोग्य केंद्रातच होत असतात. तेथेच वेळेवर व योग्य उपचार झाल्यास पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांतील योग्य व वेळीच उपचार करण्यात गावपातळीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या कार्यशाळेत दोन सत्रात उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

इतर बातम्या
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...