agriculture news in Marathi, medical service not enough for animals in fodder camp, Maharashtra | Agrowon

चारा छावण्यांमध्ये जनावरांची वैद्यकीय सेवांसाठी हेळसांड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

सांगली ः जिल्ह्यात ३८ छावण्यांत ४४ हजार ९७७ लहान मोठी जनावरे आहेत. परंतु जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागात ६२ पदे रिक्त असल्याने छावणीतील जित्राबांना योग्य वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने हेळसांड होताना दिसत आहे. त्यामुळे पशुपालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात छावण्या सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला आहे. दिवसेंदिवस छावणीत जनावरांची संख्या वाढू लागली आहे. एकाबाजूला छावणीतील जनावरांना आधार मिळत आहे. छावणीत जनावरे मोठ्या संख्येने एकत्र आल्यावर त्यांना झालेल्या साथींचा प्रसारही होण्याचा धोका असतो. म्हणून मोठ्या प्रमाणावर लसीकरण राबवावे लागते.

सांगली ः जिल्ह्यात ३८ छावण्यांत ४४ हजार ९७७ लहान मोठी जनावरे आहेत. परंतु जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागात ६२ पदे रिक्त असल्याने छावणीतील जित्राबांना योग्य वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने हेळसांड होताना दिसत आहे. त्यामुळे पशुपालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात छावण्या सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला आहे. दिवसेंदिवस छावणीत जनावरांची संख्या वाढू लागली आहे. एकाबाजूला छावणीतील जनावरांना आधार मिळत आहे. छावणीत जनावरे मोठ्या संख्येने एकत्र आल्यावर त्यांना झालेल्या साथींचा प्रसारही होण्याचा धोका असतो. म्हणून मोठ्या प्रमाणावर लसीकरण राबवावे लागते.

छावणीत जनावरांची प्रतिदिन किंवा एक दिवसाआड तपासणी करणे गरजेचे असते. परंतू पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे छावणीतील जनावरांची तपासणी केली जात नाही. त्यातच संसर्गजन्य रोगांची लसीकरण देखील झालेले नाहीत. छावणीतील जनावरांना खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागते आहे.

 छावणीत जनावरांना आधार मिळत असला तरी जनावरांचे आरोग्य जपणे हे महत्त्वाचे आहे. जनावरांची काळजी घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे असते. या विभागाकडे मंजूर पदे १६४ असून त्यापैकी ९२ पदे रिक्त आहेत. जनावरांची तपासणी करण्यासाठी वेळेत अधिकारीच येत नाहीत. त्यामुळे पशुपालकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
जत तालुक्यात सर्वाधिक छावण्या असून १८ हजार जनावरे दाखल आहेत. तालुक्यामध्ये श्रेणी एकचे १४ व श्रेणी दोनचे ९ असे एकूण २३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे मंजूर आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी व सहायक पशुवैद्यकीय अधिकारी अशी एकत्रित मिळून दहा पदे रिक्त आहेत.

कार्यरत असलेल्या सातपैकी तीनजण प्रतिनियुक्तीवर इतर ठिकाणी काम करत आहेत. प्रत्यक्षात चारच पशुवैद्यकीय अधिकारी जत तालुक्यात काम कर आहेत. त्यामुळे छावणीतील जनावरांना वैद्यकीय सेवा मिळत नाही.

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...