agriculture news in marathi medicinal benefits of Heart-leaved moonseed | Agrowon

तापावर गुणकारी गुळवेल

डॉ. विनीता कुलकर्णी
रविवार, 19 जानेवारी 2020

जळजळ होणे, बारीक ताप येणे, उष्णता वाढणे या तक्रारी लहान असल्या तरी आरोग्य बिघडवणाऱ्या असतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता महिलांनी गुळवेलीचे महत्त्व जाणून घेऊन उपयोग करावा.

गुळवेल ही हृदयाचा आकार असणारी, हिरवीगार पानांची, एखाद्या वृक्षाच्या आधारे चढणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. परसदारात किंवा तारेच्या कुंपनावरही हा वेल उत्तम पद्धतीने वाढतो. गुळवेलचे काड आणि पाने उपयुक्त असतात.

जळजळ होणे, बारीक ताप येणे, उष्णता वाढणे या तक्रारी लहान असल्या तरी आरोग्य बिघडवणाऱ्या असतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता महिलांनी गुळवेलीचे महत्त्व जाणून घेऊन उपयोग करावा.

गुळवेल ही हृदयाचा आकार असणारी, हिरवीगार पानांची, एखाद्या वृक्षाच्या आधारे चढणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. परसदारात किंवा तारेच्या कुंपनावरही हा वेल उत्तम पद्धतीने वाढतो. गुळवेलचे काड आणि पाने उपयुक्त असतात.

गुळवेली ही वनस्पती तापामध्ये अतिशय उपयुक्त आहे. विशेषतः थंडी ताप, जुनाट ताप, वारंवार येणारा ताप, कडकी या सर्व लक्षणांत गुळवेल उत्तम कार्य करते. त्यासाठी गुळवेलीच्या काडाचा छोटा तुकडा, सुंठ आणि नागरमोथा यांचा दोन कप पाण्यात उकळून काढा घेतल्यास फायदा होतो. जीर्णज्वर, कडकी यासाठी गुळवेलीपासून तयार केलेली संशमनी वटी नावाचे औषध उपलब्ध असते. या गोळ्या योग्य त्या मात्रेत घेतल्यास कडकी कमी होते. वारंवार ताप येणे थांबते.

 • गुळवेलीपासून गुळवेल सत्त्व तयार करतात. उष्णता कमी करण्यासाठी, जुनाट ताप कमी करण्यासाठी गुळवेल सत्त्व जरुर पोटात घ्यावे. गुळवेल सत्त्व तयार करायची कृती पण सोपी असते. गुळवेलीचे छोटे तुकडे ठेचून त्यात पाणी घालून भीजत ठेवावे. १० - १२ तासांनी चांगले भिजले की हाताने कुस्कुरून रवीने घुसळावे. पाणी गाळून घेऊन उन्हात ठेवल्यास पाणी उडून सत्त्व तळाशी बसते. पण या कृतीसाठी घुळवेल भरपूर प्रमाणात असावी लागते.
   
 • क्षय, दौर्बल्य, बारीक ताप यासाठी सत्त्व लोणी खडीसाखरेसह रोज घ्यावे. उपयोग होतो.
   
 • थंडीच्या दिवसात सांधे आखडणे, दुखणे, अशा तक्रारी हमखास आढळतात. अशावेळी गुळवेल आणि सुंठ पावडर पाण्यात उकळून काढा करून घ्यावा.
   
 • बऱ्याचदा टायफॉईड, मलेरिया अशा तापानंतर खूप थकवा आणि हातापायाची जळजळ होते. डोळ्यांची आग होते. ताप नसतो, पण रुग्णांना मात्र गरम असण्याची भवना असते. अशा लक्षणांकडे महिलावर्गाचे दुर्लक्ष होते. पण असे न करता गुळवेल सत्त्व तूप साखरेसह सुरू करावे. ज्यामुळे उष्णता कमी होते आणि ताकद वाढते.
   
 • गुळवेलीपासून सत्त्व काढा तयार करणे शक्य नसल्यास संशमनी वटी, गुडुची घन, गुळवेल सत्त्व, गुडुच्यादी धृत या नावाने बरीचशी औषधे उपलब्ध आहेत, त्यांचा योग्य वैद्यांचा सल्ला घेऊन उपयोग करावा.

टीपः वरील कोणतेही उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत.

संपर्कः डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७


इतर महिला
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
थकवा, अशक्‍तपणावर शतावरी गुणकारीशतावरी ही औषधी वनस्पती सर्वांनाच सुपरिचित आहे....
फळबाग, भाजीपाला शेतीतून मिळविली आर्थिक...शेतीचा कोणताच अनुभव नसताना कुऱ्हा (ता. तिवसा, जि...
ग्रामीण महिलांच्या समृद्धीचा महामार्गराज्यातील महिला बचतगट वेगवेगळ्या लघूउद्योगाच्या...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
तापावर गुणकारी गुळवेलजळजळ होणे, बारीक ताप येणे, उष्णता वाढणे या...
पूरकउद्योग अन् शेती विकासात श्री भावेश्...बेलवळे खुर्द (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील श्री...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडएखादा पूरक व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर...
भाजीपाला, फुलशेतीतून गटाने दिली नवी दिशाटिके (जि. रत्नागिरी) गावातील नवलाई आणि पावणाई या...
मिळून साऱ्या जणी, सांभाळू कंपनी  अवर्षणग्रस्त ८० गावांतील १२ हजार महिला ४०...
पापडनिर्मिती व्यवसायातून रोजगारासह...ज्वारी, तांदळाच्या पापडासह गव्हाची भुसावडी तयार...
ज्वारी पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण...भारत हा जगातील ज्वारी उत्पादनात चौथ्या क्रमांकाचा...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
महिला एकत्रीकरणातून बदलाला सुरुवातमासेमारी आणि शेतमजुरी करतो. त्यामुळे...
ममताबाई झाल्या परसबागेच्या गाइडअकोले (जि. नगर) तालुक्याच्या आदिवासी भागातील...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...