थकवा, अशक्‍तपणावर शतावरी गुणकारी

 medicinal benefits of Shatavari
medicinal benefits of Shatavari

शतावरी ही औषधी वनस्पती सर्वांनाच सुपरिचित आहे. शतावरीची मुळे उपयोगी असतात. मुळांचा आतला कठीण भाग काढून फक्त मांसल भाग वापरला जातो. औषधी उपयोग

  • रोज दुधासह १ चमचा शतावरी कल्प घेतल्यास ताकद वाढते. गर्भवती महिलांनी याचे सेवन केल्यामुळे अंगावरचे दूध वाढण्यास मदत होते. वजनही वाढते.  
  • मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांनी १ चमचा शतावरी पावडर दुधासह घ्यावी.  
  • जास्त अशक्‍तपणा आल्यास १ कप दुधामध्ये अर्धा चमचा शतावरी घालावे. त्यास अर्धा कप आटवून साखर घालून सेवन करावे. पचायला जड झाल्यास त्यात सुंठ पावडर घालून उकळावे. मलबद्धता, रक्त पडणे, कडकपणा यासाठी शतावरीपासून केलेल्या तुपाचे सेवन करावे. हे तूप मेडिकल स्टोअरमध्ये मिळते.  
  • थकवा, निरुत्साह, चिडचिडेपणा, कमी आकलनक्षमता या लक्षणांमध्ये शतावरी तूप व कल्प यांचे दुधामधून सेवन करावे.  
  • काही वेळा अशक्तपणामुळे पाय, पिंढऱ्या व सांधे दुखतात. थोडे चालले तरी पाय जड होतात. अशावेळी शतावरीपासून केलेले नारायण तेल पायांना चोळावे किंवा शेकावे.  
  • स्त्रियांमध्ये कंबरदुखी, पाठदुखी, अंगावरून पांढरा स्राव जाणे, अशक्तपणा आल्यास नारायण तेलाने मालिश करावी. तसेच शतावरी कल्पाचे सेवन करावे.  
  • कडक उन्हात काम करणे, अति तिखट पदार्थ खाण्यामुळे मूत्र विसर्जनाच्या वेळी आग होते. त्यासाठी ओल्या कोवळ्या शतावरीचा रस दूध, साखर घालून प्यावा. जास्त त्रास होत असल्यास योग्य त्या तपासण्या करून औषधोपचार करावा.
  • पथ्य

  • बाहेरचे, चमचमीत, शिळे अन्न, ठेचा, लोणचे-पापड हे पदार्थ खाणे टाळावे. यातील मीठ आणि तिखटाचे प्रमाण उष्णता वाढवते.  
  • स्त्रियांनी कष्टाच्या बरोबरीने पौष्टिक आहार जरूर घ्यावा.
  • काळजी घेणे  

  • अंगावरून पांढरा स्राव जाणे, कंबरदुखी, अशक्तपणा या लक्षणांसाठी रक्त तपासणी, सोनोग्राफी, गर्भाशय तपासणी, जीवनसत्त्व डी, कॅल्शिअम, थायरॉइड या सर्व तपासण्या आवश्‍यकतेप्रमाणे कराव्यात.  
  • त्रास वाढल्यास दुर्लक्ष करू नये.
  • टीपः शतावरीचा वापर तज्ज्ञांचा सल्या घेऊनच करावा. संपर्कः डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com