पशुवैद्यकांनी उपलब्ध औषधी पर्याय पशुधनासाठी वापरावे ः डॉ. मार्कंडेय

परभणी (प्रतिनिधी)ः ‘‘दुधाळ जनावरांची प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी उपलब्ध औषधी पर्याय पशुवैद्यकांनी कार्यक्षेत्रातील पशुधनासाठी वापरावे. त्यामुळे भविष्यात दूध उत्पादन भरीव प्रमाणात वाढविता येईल. टाळेबंदीनंतर पशुपालकांचे उत्पन्न दुप्पट करता येणे सहज शक्य होईल,’’ असे मत परभणी येथील पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितिन मार्कंडेय यांनी केले.
Medicinal options available by veterinarians Use for livestock: Dr. Markandey

टाळेबंदीच्या काळात पशुवैद्यकांना निरंत तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गंत बुधवारी (ता.६) राष्ट्रीय वेबीनार आयोजित करण्यात आले. सर्व राज्यातील २ हजार २०० पशुवैद्यकांनी त्यात भाग घेतला. डॉ. मार्कंडेय यांनी त्यांना दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन,आहार,आणि प्रजननातील अडथळे निर्माण करणाऱ्या समस्या, वंध्यंत्व निवारणाचे उपाय सांगितले. 

डॉ. मार्कंडेय यांचे सादरीकरण देशातील सर्व पशुवैद्यकांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आले. या वेबिनारसाठी डॉ. नितिन भाटिया, डॉ. बाबुलाल कुमावत यांनी सहकार्य केले. पशुप्रजनन विषयक प्राप्त साडेतीन हजार प्रतिक्रिया आणि शंकाना उत्तरे जाणार आहेत. अशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालयातर्फे नियमितपणे राबविले जातील, असी माहिती डॉ. मार्कंडेय यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com