agriculture news in Marathi, medicinal use of Miliusa tomentosa | Agrowon

अशक्तपणावर उपयुक्त हुम्भ

अश्विनी चोथे
शनिवार, 22 जून 2019
 • स्थानिक नाव    :   हुम्भ, हुंब, ठोस्का         
 •    शास्त्रीय नाव    :  Miliusa  tomentosa (Roxb.) Sinclair       
 •    कूळ    :     Annonaceae       
 •    इंग्रजी नाव     :  Tomentose Miliusa, Hoom    
 •    उपयोगी भाग    :  कोवळी पाने, फुले, पिकलेली फळे 
 •    उपलब्धीचा काळ    :  कोवळी पाने:- मार्च-एप्रिल,  फुले:- एप्रिल-मे, 
 •    पिकलेली फळे :- मे-जुलै        
 •    झाडाचा प्रकार    : झाड        
 •    अभिवृद्धी     : बिया       
 •    वापर    : पिकलेली फळे 

 

आढळ

 • स्थानिक नाव    :   हुम्भ, हुंब, ठोस्का         
 •    शास्त्रीय नाव    :  Miliusa  tomentosa (Roxb.) Sinclair       
 •    कूळ    :     Annonaceae       
 •    इंग्रजी नाव     :  Tomentose Miliusa, Hoom    
 •    उपयोगी भाग    :  कोवळी पाने, फुले, पिकलेली फळे 
 •    उपलब्धीचा काळ    :  कोवळी पाने:- मार्च-एप्रिल,  फुले:- एप्रिल-मे, 
 •    पिकलेली फळे :- मे-जुलै        
 •    झाडाचा प्रकार    : झाड        
 •    अभिवृद्धी     : बिया       
 •    वापर    : पिकलेली फळे 

 

आढळ

 •    हुम्भची पानझडी झाडे संपूर्ण राज्यात आढळतात. डोंगराळ भागातील घनदाट जंगलात तसेच शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला व देवराईच्या भागात हुम्भची झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात.  
 • वनस्पतीची ओळख 
 •    पानझडी झाडे साधारण १५ ते २० सें.मी. उंच वाढतात. झाडाची साल गडद करड्या रंगाची असून, उभ्या भेगायुक्त असते.
 •    कोवळ्या सालीवर बारीक, तपकिरी रंगाची लव असते. पाने जाड, गडद हिरव्या रंगाची, अंडाकृती आकाराची असून, ५ ते १० सें. मी. लांब व २ ते ५ सें. मी. रुंद, वरून मऊ   खालून बारीक लवयुक्त व टोकाशी बोथट किंवा टोकदार, पानाच्या कडा दातेरी  असतात.
 •    पाने कोवळी असताना लवदार व कालांतराने गुळगुळीत होतात. पानाचे देठ मजबूत ०.२ ते ०.६ सें. मी.  लांबीचे असते.
 •    फुले द्विलिंगी, पानाच्या किंवा फांदीच्या बगलेतून एकाकी किंवा २ ते ३ येणारी व खाली लोंबकळणारी, हिरवट पिवळ्या रंगाची. पाकळ्या ६ व प्रत्येक पाकळीत एक चॉकलेटी रंगाची रेष असते. फुले गडद तपकिरी रंगाच्या लवयुक्त असतात.
 •    फुलांचे देठ ५ ते ७ सें. मी. लांब. फळे ३ ते ४ घोसात येणारी असतात. फळे गोल, हिरव्या रंगाची ५ ते १० एकत्रित घोसात येणारी, ४ ते ५ सें. मी. व्यासाची, फळांचे देठ १ ते १.५ सें. मी. लांब असते. पिकल्यावर गडद जांभळ्या रंगाच्या बिया होतात. 
 •    फेब्रुवारी-मार्चमध्ये झाडाची पूर्ण पाने गळून जातात. फुले एप्रिल ते मेमध्ये येतात. फळे मे ते जुलैदरम्यान तयार होतात. 

औषधी उपयोग 

 • बाळंतपणानंतर अंगावरील सूज कमी करण्यासाठी कच्च्या वाळलेल्या हुम्भच्या फळांची जाडसर पावडर करून त्याचा वाफेरा दिवसातून एकवेळा बाळंतिणीला शेकण्यासाठी देतात. 
 • सालीपासून तयार केलेला काढा हगवणीपासून आराम पडण्यासाठी उपयुक्त आहे.
 • अशक्तपणा कमी करण्यासाठी लहान मुलांना ताजी फळे खाण्यासाठी दिली जातात.

इतर उपयोग 

 • पिकलेली आंबट गोड फळे खाण्यासाठी वापरतात. 
 •  लाकूड अतिशय कडक व मजबूत असल्यामुळे त्याचा वापर घरातील साहित्य, दरवाजे व खिडक्या, छपराचे वासे बनविण्यासाठी, तसेच शेतीची अवजारे बनविण्यासाठी केला जातो.

 

पाककृती 

कोवळ्या पानाची व फुलांची भाजी  
   साहित्य : २ ते ३ वाट्या हुम्भची कोवळी पाने किंवा फुले, १ मोठा बारीक कापलेला कांदा, १ ते दीड चमचा हिरवी मिरची व लसूण पेस्ट किंवा २ कापलेल्या हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ.
   कृती : कोवळी पाने/ फुले निवडून स्वच्छ धुऊन कापून घ्यावी. फुलांची फक्त देठे काढून घ्यावीत. एका पातेल्यात पाणी गरम करून पाला/फुले वाफवून व पिळून घ्यावी. एका कढाईत तेल गरम करून जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्यावी, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची-लसूण पेस्ट परतून घ्यावी. नंतर त्यात वाफवून पिळून घेतलेली पाने/फुले मोकळी करून चांगले परतवून घ्यावे. पाच मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. चवीनुसार मीठ  मिसळावे.

 इमेल - ashwinichothe7@gmail.com
(क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर औषधी वनस्पती
पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त स्थानिक नाव     ः  ...
त्वचारोग, मधुमेह, संधिवातावर बोंडारा... स्थानिक नाव ः बोंडारा     ...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
पोटशूळ, इसब आजारांवर उपयुक्त काटेमाठ  स्थानिक नाव    : काटेमाठ...
दमा, खोकल्यावर गुणकारी घोळ स्थानिक नाव    :   ...
बहुगुणी तेलबिया पीक लक्ष्मीतरूलक्ष्मीतरू (शास्त्रीय नाव - Simarouba glauca...
त्वचारोगावर टाकळा उपयुक्त स्थानिक नाव    :  ...
अशक्तपणावर उपयुक्त हुम्भ स्थानिक नाव    :   ...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
आरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...
अशी करा अडुळसा लागवडअडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर...
अशी करतात गवती चहाची लागवड गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी...
अपचन, त्वचारोगावर उपयुक्त मोखा स्थानिक नाव     ः मोखा, मोकडी,...
औषधी, अन्न प्रक्रियेसाठी पुदिना उपयुक्तपुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, पाचक...
जुलाब, हगवणीवर टेंभुरणी उपयुक्तटेंभुरणीचे झाड शेताच्या बांधावर तसेच माळरानावर...
अशक्तपणा, त्वचा रोगावर उंबर उपयुक्त स्थानिक नाव    : उंबर, औदुंबर...
पोटदुखीवर गुणकारी वाघेटीवाघेटीच्या काटेरी वेली जंगलात डोंगरकपारीला मोठ्या...