‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना साकडे

Meet Sharad Pawar to start 'Nasaka'
Meet Sharad Pawar to start 'Nasaka'

नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू झाले आहे. याप्रश्‍नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी खासदार हेमंत गोडसे यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच विशेष बैठक घेतली जाणार आहे. 

राज्यभरातील सहकारी तत्त्वावरील अनेक साखर कारखाने अडचणीत आहेत. जिल्ह्यात एकावेळी साखर उद्योगात आघाडीवर असलेला ‘नासाका’चाही यात समावेश आहे. या कारखान्याची गाळपक्षमता प्रतिदिन १२५० मॅट्रिक टन असून कारखान्याचे सुमारे १७ हजारांवर सभासद आहेत. कारखान्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून उचललेल्या कर्जाच्या रकमेवर व्याजाचा वाढता डोंगर, जिल्हा बँकेने कारखान्याची केलेली जप्ती, कारखान्यावर अवसायकाची नियुक्ती या फेऱ्यात काही वर्षांपासून कारखाना सापडला आहे. 

नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर या चार तालुक्यांतील ३५५ गावांचे कार्यक्षेत्र असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) चार ते पाच वर्षांपासून धूळ खात पडून आहे. ‘नासाका’ बंद पडल्याने चार तालुक्यांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली असून, शेकडो कामगारांचा रोजगार अडचणीत आहे. 

नासाका पुन्हा सुरू झाल्यास चार तालुक्यांमधील शेतातील उसाचा प्रश्‍न निकाली लागेल, असे खासदार गोडसे यांनी शरद पवार यांना पटवून दिले. कारखाना सुरळीत सुरू झाल्यास दहा ते बारा वर्षांत कर्जाची पूर्ण परतफेड होऊ शकेल, असा विश्‍वास कारखान्याचे माजी अध्यक्ष तानाजी गायधनी यांनी श्री. पवार यांच्यासमोर व्यक्त केला. या वेळी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह ‘नासाका’चे माजी अध्यक्ष तानाजी गायधनी, दिनकर पाटील यांनी नवी दिल्ली येथे शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आणि ‘नासाका’ तातडीने सुरू करण्यासाठी त्यांना साकडे घातले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com