शिंदे, ॲड. आंबेडकर भेटीने सोशल मीडियात राजकीय खसखस

अॅड. प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे चर्चा करताना
अॅड. प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे चर्चा करताना

सोलापूर   ः सोलापूर लोकसभेचे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची शनिवारी (ता. १३) सकाळी एका हॉटेलमध्ये अनपेक्षित भेट झाली. ही भेट निव्वळ योगायोग होता, असे सांगण्यात आले. पण त्यावरून दिवसभर सोशल मीडियासह सर्वत्र चांगलीच राजकीय खसखस पिकली.

ॲड. प्रकाश आंबेडकर हे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह सकाळी नाश्ता करत असताना सुशीलकुमार शिंदे त्याच हाॅटेलमध्ये काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यास आले होते.  प्रकाश आंबेडकर येथेच बसले आहेत, म्हटल्यावर त्यांनी तिथे जाऊन भेट घेतली आणि दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अर्थात राजकारणावर या वेळी कोणतीच चर्चा  झाली नाही. अवघ्या काही मिनिटांचा हा प्रसंग होता, असे सांगण्यात आले पण या भेटीने सोशल मीडियासह शहर जिल्ह्यात एकच चर्चा रांगली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com