Agriculture news in Marathi, A meeting of agricultural ministers convened today on questions of agricultural assistants | Agrowon

कृषी सहायकांच्या प्रश्नांवर आज कृषिमंत्र्यांनी बोलावली बैठक

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

अकोला ः अमरावती विभागातील रखडलेल्या कृषी सहायक ते कृषी पर्यवेक्षक पदोन्नतीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मंगळवारी (ता. २७) मुंबईत बैठक बोलविली आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो यावर कृषी सहायकांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. 

अकोला ः अमरावती विभागातील रखडलेल्या कृषी सहायक ते कृषी पर्यवेक्षक पदोन्नतीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मंगळवारी (ता. २७) मुंबईत बैठक बोलविली आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो यावर कृषी सहायकांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. 

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील कृषी सहायकांना कृषी पर्यवेक्षकपदी वर्षानुवर्षे पदोन्नती मिळालेली नाही. अनेकजण पात्र असूनही त्यांना हक्काची पदोन्नती मिळालेली नसल्याने आहे त्याच पदावर काम करीत आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी सहायक संघटनेने टप्प्याटप्‍याने आंदोलन छेडले आहे. सोमवार (ता. २६) पासून अमरावती विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. यापूर्वी गुरुवारी (ता. २२) अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत कार्यरत असलेले शेकडो कृषी सहायक धरणे देण्यासाठी एकवटले होते. 

अमरावती विभागात सन २०११ मध्ये कृषी सहायक ते कृषी पर्यवेक्षक पदोन्नत्या करण्यात आल्या. त्यानंतर गेल्या आठ वर्षांत ही प्रक्रिया या विभागात राबविण्यात आलेली नाही. २०११ ची पदोन्नती प्रक्रिया अंतरिम ज्येष्ठता यादीच्या आधारे तदर्थ पदोन्नती देऊन करण्यात आली होती. त्यानंतर ज्येष्ठता यादी २७ आॅक्टोबर २०१५ ला प्रमाणित करून अंतिम करण्यात आली. ही सूची अंतिम मानल्यास २०११ मध्ये दिलेल्या तदर्थ स्वरूपाच्या पदोन्नत्या चुकीच्या पद्धतीने झाल्या हेही स्पष्ट होते. तदर्थ पदोन्नती मिळालेले काही जण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या नागपूर खंडपीठात अपिलात गेलेले असल्याने ही प्रक्रिया पुढे जाऊ शकलेली नाही. जोपर्यंत न्यायालयीन प्रकरणाचा न्यायनिवाडा पूर्ण होत नाही, तोवर कृषी सहायकांना पदोन्नती देण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. 

साखळी उपोषण सुरू 
कृषी सहायकांनी मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात बुधवारी (ता. २८) अकोला व वाशीम जिल्ह्यातील आणि गुरुवारी (ता. २९) बुलडाणा जिल्ह्यातील कृषी सहायक सहभागी होत आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...