बाजार समिती कायद्यातील सुधारणांबाबत सर्व घटकांचा विचार करूनच निर्णय : पणनमंत्री

पणनमंत्री सुभाष देशमुख
पणनमंत्री सुभाष देशमुख

मुंबई   : राज्य शासन सर्वांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा सुधारणांबाबत बाजार समितीशी संबंधित सर्व घटक शेतकरी, व्यापारी, आडते, माथाडी कामगार आदी सर्वांचा विचार करून सर्वांना हितदायक ठरेल, असाच निर्णय शासन घेईल. यासाठी सर्वांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी (ता. २२) केले. तसेच मंगळवारी (ता. २७) होणारा संप माघारी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यांमध्ये नव्याने अंतर्भूत करण्यात आलेल्या सुधारणांबाबतच्या आक्षेपांबद्दल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मंत्रालयात आयोजित या बैठकीस गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब मुरकुटे, माधव भंडारी, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, सहकार आयुक्त सतीश सोनी, पणन संचालक दीपक तावरे तसेच व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी स्पर्धा निर्माण व्हावी, शेतकऱ्यांचे पैसे २४ तासांत मिळावे, त्यांच्या उत्पादनास चांगला भाव मिळावा हा महत्त्वाचा विचार आहे. हा कायदा करताना सर्वांना विश्वासात घेऊन कोणालाही याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेत हा कायदा करू, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.

माथाडी कामगारांच्या वतीने नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माधव भंडारी, बाळासाहेब मुरकुटे तसेच सर्व व्यापारी आणि  त्यांच्या प्रतिनिधींचे या कायद्याबाबतचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. हा कायदा करताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने सुवर्णमध्य काढू, असे पणनमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com