agriculture news in Marathi meeting on cane choping rate Maharashtra | Agrowon

शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी मजुरी दरावर  तोडग्यासाठी आज बैठक 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज (ता.२७) मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इस्टीट्युट येथे बैठकीचे आयोजन केले आहे.

नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज (ता.२७) मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इस्टीट्युट येथे बैठकीचे आयोजन केले आहे. 

साखर संघाचे अध्यक्ष, संचालक व राज्यातील सुमारे सात ऊस तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकींना आमंत्रित केले आहे. बैठकीत ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात किती वाढ होते हे पाहण्यासाठी कारखानदारांचेही बैठकीकडे लक्ष लागले आहे. 

राज्यातील ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दराचा करार संपल्याने नव्याने करार करुन दरात दुप्पट वाढ करावी, अशी मागणी करत ऊसतोडणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. एखादा अपवाद वगळता संपामुळे यंदा अजूनही कामगार कारखान्यावर गेलेले नाहीत. सर्वाधिक सहा लाखाच्या जवळपास ऊसतोडणी मजूर बीड जिल्ह्यात आहेत. मात्र ऊसतोडणी कामगारांच्या संपावरुन राजकारण सुरु झाल्याने कोयते बंदच आहेत. 

त्यातच उसाचे क्षेत्र यंदा अधिक असल्याने कारखान्याचा गाळप हंगाम लांबण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. संप सुरु असल्याने अनेक कारखाने सुरु झाले नाहीत, आणि चार बैठका होऊनही संपावर तोडगा निघाला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत होती. त्यानुसार आज (ता. २७) मांजरी येथील वसंतदादा शुगर इस्टीट्युट येथे बैठकीचे आयोजन केले आहे. साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजीमंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्यातील सात ऊसतोडणी कामगार संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला हजर असतील. 

संपाबाबत श्री पवार यांच्या मध्यस्थीने काय निर्णय होणार, मजुरांना किती दरवाढ मिळणार याकडे कामगारांसह साखर कारखानदारांचे लक्ष लागले आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...