agriculture news in marathi, meeting of congress committee, mumbai, maharashtra | Page 2 ||| Agrowon

काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी  मुख्यमंत्री प्रयत्नशील ः अशोक चव्हाण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 जून 2019

लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला म्हणून विखे पाटील यांनी फाजील आत्मविश्वास बाळगणे योग्य नाही. लोकसभेला यश मिळाले म्हणून भाजपनेही हुरळून जाण्याचे कारण नाही. या सरकारवर लोक नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा आणि विधानसभेचे विषय वेगळे असतात. त्यामुळे निकालही वेगळे असू शकतात हे याआधी सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय येईल.

- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

मुंबई : काँग्रेस आमदारांनी पक्ष सोडावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना फोन करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केला. भाजपमध्ये गेलेले काँग्रेसचे जुने सहकारीसुद्धा आमच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

विधान सभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजप प्रवेशाची तयारी चालवली आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे ८ ते १० आमदार भाजपमध्ये जातील, असा दावा केला जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या आमदारांमध्ये अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे, कालिदास कोळंबकर, भारत भालके यांच्या नावांची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्री प्रचंड खटाटोप करीत आहेत. अनेक आमदारांना ते फोन करत आहेत. मात्र आता कोणीही पक्ष सोडेल असे वाटत नाही. काँग्रेसचे आमदार भाजपच्या दिशेने जाणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करलेल्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी अशोक चव्हाण यांनी टिळक भवनमध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. चव्हाण यांनी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केल्याची माहिती दिली. नांदेड जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या राजीनाम्यावर विचार केला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत चर्चा झाली. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यास हरकत नाही, असा सूर लावला. आंबेडकर यांना सोबत घेऊन जाण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे यासंदर्भात आता त्यांनीच निर्णय घ्यावा, असे चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
 

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...