पोल्ट्रीप्रश्‍नी गंगापुरात आज सभा

पोल्ट्रीप्रश्‍नी गंगापुरात आज सभा
पोल्ट्रीप्रश्‍नी गंगापुरात आज सभा

औरंगाबाद ः कोरोनाचा चिकनशी संबंध असल्याच्या भीतीच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय जवळपास उद्ध्वस्त झाला आहे. या व्यवसायाशी जोडलेल्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर येथे पोल्ट्री व्यवसायिकांची सोमवारी (ता. १६) सहविचार सभा आयोजित केली आहे. किसान सभेचे डॉ. अजित नवले सहविचार सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. शेतकरी कार्यकर्ते धनंजय धोर्डे, ज्ञानेश्वर जगताप, दीपकसिंग राजपूत, दत्तू पाटील, शेख इब्रान, सूरज पवार, के. टी. तांबे आदींनी सभा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  कोरोना व्हायरस चिकनमधून पसरत असल्याची अफवा पसरविली गेल्याने राज्यातील पोल्ट्री व्यवसाय प्रचंड अडचणीत सापडला आहे. ग्राहकांनी चिकन व अंड्यांकडे पाठ फिरविल्याने कोंबडीचे दर ५ ते १० रुपये किलोपर्यंत खाली कोसळले आहेत. १ किलो वजनाची कोंबडी तयार करण्यासाठी ७५ रुपये खर्च येतो. ३ किलो वाढ झालेल्या कोंबडीचा उत्पादन खर्च साधारणपणे २१५ रुपये असतो. अशा परिस्थितीत कोंबडीचे दर ५ ते १० रुपये किलो पर्यंत कोसळल्यामुळे पोल्ट्री व्यवसाय कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे. शेती परवडत नाही म्हणून राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून पोल्ट्री व्यवसाय सुरू केले. अत्यंत कष्टाने व्यवसायाची घडी बसविली. आता मात्र केवळ एका अफवेने हा व्यवसाय उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. पोल्ट्री व्यवसायावर राज्यातील लाखो कुटुंबांचा उदर निर्वाह अवलंबून आहे. पोल्ट्री व्यवसायात कार्यरत असलेले लाखो मजूर, चिकन व अंडी वाहतूक व्यवसायिक, कटिंग, ट्रेडिंग व हॅचरी व्यवसायिक, पोल्ट्री आहार उत्पादक यांचा रोजगार पोल्ट्री व्यवसायावर अवलंबून आहे. पोल्ट्री व्यवसायाशी जोडल्या गेलेल्या सर्वांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. मका, सोयाबीन, डी. ओ. सी., राईस पॉलीश, भरड धान्य, तांदूळ यांचा वापर पोल्ट्री आहारात केला जातो. कोंबडीचे दर कोसळल्यामुळे या खाद्याचेही दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. अफवा पसरण्यापूर्वी मकाला  २२ रुपये किलो  दर मिळत होता. आता पोल्ट्रीमधील मंदीच्या पार्श्वभूमीवर मकाचे दर १२ रुपये किलोपर्यंत खाली कोसळले आहेत. मका, तांदूळ, सोयाबीन व भरड धान्य उत्पादक शेतकरीही यामुळे संकटात सापडले आहेत. अशा आहेत मागण्या

  • सरकारने या पार्श्वभूमीवर पोल्ट्री उद्योग सावरण्याच्या दृष्टीने तातडीने पावले टाकावीत. 
  • चिकन किंवा अंडी खाल्ल्याने कोरोना होतो ही अफवा असल्याचे शासकीय स्तरावरून स्पष्ट करण्यासाठी व्यापक मोहीम घ्यावी.
  • अफवा पसरविणारांऱ्यांवर कारवाई करावी.
  • सरकारने पोल्ट्री उद्योगाचे वीजबिल तातडीने माफ करावे. 
  • पोल्ट्रीसाठी संकट काळात मोफत वीज पुरवावी.
  • संकटात संपलेल्या पोल्ट्रीधारकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी.
  • संकटात असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांच्या कर्जाचे संकट काळातील व्याज माफ करावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com