कुकडीच्या पाण्याबाबत लवकरच बैठक

कुकडीच्या पाण्याबाबत लवकरच बैठक
कुकडीच्या पाण्याबाबत लवकरच बैठक

सोलापूर : करमाळा तालुक्‍याला कुकडीचे पाणी मिळावे, याबाबत लवकरच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून बैठक बोलावली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कुकडी-सीना संघर्ष समितीला दिले.

बच्छावत आयोगाच्या शिफारशीनीसार कुकडी प्रकल्पातील पाण्याचे वाटप करून करमाळा तालुक्‍याला हक्काचे ५.५० टीएमसी पाणी मिळावे, तालुक्‍यातील सीना नदीवरील खडकी, तरटगाव, पोटेगाव व संगोबा येथील बंधाऱ्यातं कुकडीचे पाणी सोडावे, अशी मागणी सीना नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांची आहे. या मागणीचे निवेदन पालकमंत्री देशमुख यांना संघर्ष समितीने बुधवारी (ता. २४) दिले. या वेळी समितीचे अध्यक्ष अभियंता प्रकाश कोळेकर, सचिव बबन मुरुमकर, प्रसिद्धिप्रमुख प्रा. शशिकांत नरुटे, विशाल कोळेकर उपस्थित होते.

कमी पाऊस पडत असल्यामुळे सीना नदी सतत कोरडी राहत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सीना नदीत कुकडीचे पाणी सोडल्यास सोलापूरसह अहमदनगर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही गावांना उपयोग होणार आहे. सीना नदीत चोंडी येथील बंधाऱ्यापर्यंत कुकडीचे पाणी येत आहे. तेच पुढे सोडल्यास करमाळा तालुक्‍यातील बंधारे भरले जातील.

याशिवाय मांगी तलावात पाणी सोडल्यास चारीद्वारे नदीत पाणी सोडता येऊ शकते. नदीशीवाय या भागात पाण्याचा दुसरा स्रोत नाही. नदी कोरडी राहत असल्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे, असे निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनाही निवेदन देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com