Agriculture news in Marathi, The meeting of the Nashik Bazar Committee was adjourned within minutes | Agrowon

नाशिक बाजार समितीची बैठक काही मिनिटांत गुंडाळली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

नाशिक : बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे हे लाच घेण्याच्या प्रकरणात अडकल्यानंतर बाजार समिती संचालकांची बैठक गेल्या सोमवारी गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली होती. ही बैठक पुन्हा गुरुवारी (ता. ५) बोलाविण्यात आली. मात्र, या बैठकीला लाच घेण्याचा आरोप असलेले सभापती शिवाजी चुंभळे उपस्थित होते. नंतर बैठक सुरू झाल्यानंतर बैठक अवघ्या काही मिनिटांत बैठक गुंडाळण्यात आली.

नाशिक : बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे हे लाच घेण्याच्या प्रकरणात अडकल्यानंतर बाजार समिती संचालकांची बैठक गेल्या सोमवारी गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली होती. ही बैठक पुन्हा गुरुवारी (ता. ५) बोलाविण्यात आली. मात्र, या बैठकीला लाच घेण्याचा आरोप असलेले सभापती शिवाजी चुंभळे उपस्थित होते. नंतर बैठक सुरू झाल्यानंतर बैठक अवघ्या काही मिनिटांत बैठक गुंडाळण्यात आली.

बैठकीला सत्ताधारी चुंभळे आणि विरोधात असलेल्या पिंगळे या दोन्ही गटांचे संचालक उपस्थित होते. मात्र, पिंगळे गटाच्या संचालकांना बाजू मांडू न दिल्याने उपसभापती युवराज कोठुळे आणि सचिव अरुण काळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी गटाच्या सात संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेऊन केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर कायम करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर जिल्हा उपनिबंधकांनी धोरणात्मक व आर्थिक व्यवहारासंबंधी कामकाजात सहभागी करून घेऊ नये, असे पत्र बाजार समिती सचिवांना दिले होते. या कामकाजात चुंबळे सहभागी झाले, तर त्याची जबाबदारी सचिवांवर राहील, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. २) उपसभापती कोठुळे यांनी तातडीची बैठक बोलावली होती. 

ही बैठक चुंभळे यांच्यावर झालेली कारवाई; तसेच त्यांच्या सह्यांचे अधिकार काढल्यानंतर पुढील चर्चा करण्यासाठी बोलावली होती. मात्र, स्वत: उपसभापती कोठुळे व अन्य काही संचालक गैरहजर राहिल्याने बैठक तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब बैठक गुरुवारी (ता. ५) झाली. या बैठकीस दोन्ही गटांचे संचालक उपस्थित होते. उपसभापती कोठुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. त्या वेळी सभापती शिवाजी चुंभळेदेखील उपस्थित होते. मात्र, पुढे बैठक चालू होऊन काही वेळातच बैठक गुंडाळण्यात आल्याने संतप्त झालेल्या विरोधी गटाच्या संचालकांनी ही भूमिका घेतली आहे.

नेमका काय आहे आरोप? 
सोमवारी (ता. २) तहकूब झालेली बाजार समितीच्या बैठकीत प्रोसिडिंग चुकीचे केले आहे. तसेच गुरुवारी (ता. ५) संचालकांच्या बैठकीत विरोधी गटाच्या संचालकांनी नोंदविलेल्या हरकती व मांडलेल्या विषयांची नोंद न करता सचिव अरुण काळे व उपसभापती युवराज कोठुळे यांनी मनमानी करून कारभार केला आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी संचालक प्रभाकर मुळाणे, रवींद्र भोये, संजय तुंगार, तुकाराम पेखळे, शंकर धनवटे, दिलीप थेटे, विश्वास नागरे यांनी स्वाक्षरीसह लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...