Agriculture news in Marathi Meeting of State Executive of Farmers' Union today | Agrowon

शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जानेवारी 2020

औरंगाबाद : शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक औरंगाबाद येथील गांधी भवनात बुधवारी (ता. १५) आयोजित करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा या बैठकीच्या केंद्रस्थानी राहणार असून, शेतमालाला हमी दर, शेतकरी विरोधी कायदे, आयात-निर्यात धोरण आदींवर चिंतन करून पुढील आंदोलनाची रणनीती ठरविली जाणार असल्याचे शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे. 

औरंगाबाद : शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक औरंगाबाद येथील गांधी भवनात बुधवारी (ता. १५) आयोजित करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा या बैठकीच्या केंद्रस्थानी राहणार असून, शेतमालाला हमी दर, शेतकरी विरोधी कायदे, आयात-निर्यात धोरण आदींवर चिंतन करून पुढील आंदोलनाची रणनीती ठरविली जाणार असल्याचे शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे. 

या संदर्भात शेतकरी संघटनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, २०१९ च्या निवडणुकीत बहुतांश राजकीय पक्षांनी सरसकट कर्जमाफीचा नारा दिला. परंतू मोदी व ठाकरे सरकारने शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांनाच नेहमी सत्तेची संधी मिळत आहे. केंद्रात व्ही. पी. सिंगांपासून मोदी सरकारपर्यंत आणि महाराष्ट्रात अ. र. अंतुलेंपासून फडणवीस यांच्यापर्यंत हाच अनुभव आहे. स्व. शरद जोशी यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेने केलेल्या कर्जमुक्‍ती आंदोलनात शेतकऱ्यांवरील कर्ज हे सरकारचे पाप असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. 

तरीही निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष वारंवार कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने निवडणुकांमध्ये सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊनही धोका दिला आहे. दुष्काळ व अतिवृष्टीने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. केंद्राने घोषित केलेल्या हमीभावाने एकाही बाजार समितीत शेतीमालाची खरेदी होत नाही. ई-नाम सारख्या सुविधा हाणून पाडण्यासाठी बाजार समित्यांच्या संचालक मंडळांसह आमदार, खासदार प्रयत्न करीत आहेत. 

या बैठकीला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, प्रदेशाध्यक्ष ॲड. अजित काळे, महिला आघाडी अध्यक्षा विमलताई आकणगिरे, बळिराजा पार्टीचे शिवाजीनाना नांदखिले, विभाग प्रमुख बंडू सोळंके, बाळासाहेब पटारे, धनंजय काकडे, दिनकर दाभाडे, गणेश घुगे, उपाध्यक्ष दत्ता कदम, जिल्हाध्यक्ष  निलेश बारगळ आदी उपस्थिती राहणार आहेत.


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...