Agriculture news in Marathi Meeting today on banana crop insurance | Agrowon

केळी पीक विम्याबाबत आज बैठक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

कृषी विभागाने तातडीने संबंधित पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले असून, याबाबत गुरुवारी (ता. २२) विमा कंपनी, कृषी विभागातील वरिष्ठ व विमा कंपनीसोबत तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठक होणार आहे.

जळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी लागू केलेल्या परतावा निकषांमुळे (मानके) शेतकऱ्यांना लाभ न मिळता विमा कंपन्यांना फायदा होणार असल्याच्या तक्रारींची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. कृषी विभागाने तातडीने संबंधित पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले असून, याबाबत गुरुवारी (ता. २२) विमा कंपनी, कृषी विभागातील वरिष्ठ व विमा कंपनीसोबत तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठक होणार आहे.

केळी पिकासाठी परतावा निकष अयोग्य असल्याच्या मुद्द्यावर अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील, केळी उत्पादक डॉ. राजेंद्र पाटील, विकास महाजन, अमोल पाटील, शशांक पाटील, राहुल पाटील, पितांबर पाटील, विनोद तराळ आदींनी मंगळवारी (ता. २०) मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली.

यानंतर बैठक झाली. या बैठकीस कृषिमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, शिरीश चौधरी, केळी उत्पादक शिष्टमंडळाचे प्रतिनिधी भागवत पाटील, रमेश पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, तसेच मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव सहकार अनुप कुमार, कृषी सचिव एकनाथ डवले, हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांची उपस्थिती होती.

या योजनेसंबंधी विमा हप्ते स्वीकारण्याचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे तातडीने विमा कंपन्यांसमवेत बैठक आयोजित करावी व चर्चा करून मार्ग काढावा, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. विविध कारणांमुळे पिकांचे आणि फळपिकांचे नुकसान होते. मात्र, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात मोठा त्रास होतो. यावर केंद्राने कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे, असेही मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले.  ही बैठक घेण्याबरोबरच एनडीआरएफच्या धर्तीवर काही प्रमाणात नुकसान भरपाई देता येते का व पीक विम्यासंदर्भात समिती स्थापन करून त्यात तज्ज्ञांचा समावेश करावा व विम्याच्या विविध मॉडेल्सचा अभ्यास करावा यावरही कृषिमंत्री भुसे यांनी बैठकीत सूचना केली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जळगाव भागात केळीचा सहा हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. सुमारे दीड लाख लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे. देशातील केळी उत्पादनात जळगावचा वाटा २२ टक्के आहे. यामुळे केळी पिकासाठी विमा संरक्षण चांगले असावे. केळीसाठी पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान होणार असून यावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही आपण मुद्दा उपस्थित केला आहे. याप्रश्‍नी तोडगा काढावा, अशी मागणी पाटील यांनी केली. कृषी सचिव एकनाथ डवले यांनी प्रारंभी योजनेविषयी माहिती दिली. केंद्राने पीकविमा योजनेतील सहभाग ऐच्छिक केला आहे. आपला विमा हप्त्यातील सहभागही आणखी मर्यादित केला आहे. योजनेत सध्याच्या कंपन्यांची निविदा रद्द करण्याबाबत केंद्राकडे तीनदा विनंती केली आहे. मात्र, त्यास मान्यता मिळाली नाही.


इतर अॅग्रो विशेष
संशोधनवृत्तीला सातत्याची जोड शेतीउपयोगी...प्रत्येक माणसात एक संशोधक दडलेला असतो. अगदी खेळणी...
वीज जोडणी न देताच कृषीपंपाची लाखोंची...नांदेड : कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच...
कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल :...मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटवले...
‘स्वाभिमानी’चा मोर्चा स्थगितसातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कऱ्हाडला...
संत्रा पट्ट्यातून ‘किसान रेल’ सुसाटनागपूर : संत्रा वाहतुकीकरिता रेल्वेचा स्वस्त आणि...
संत्रा आंबिया बहाराला ४२ कोटींची भरपाईअमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या...
केळी उत्पादकांची लूट थांबवा, अन्यथा...गिरगाव, जि. हिंगोली : राज्यातील अन्य...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः बंगालच्या उपसागराच्या आग्नेय व नैऋत्य...
शेतकऱ्यांनी पकडले सोयाबीन चोरअमरावती : घराच्या अंगणात ठेवलेले ३१ पोते सोयाबीन...
शासकीय खरेदीला प्रारंभ; कापूस दरात...जळगाव ः खानदेशात शासकीय कापूस खरेदी सुरू होताच...
सहकारी संघाकडूनही गाईच्या दूधदरात कपात नगर ः लॉकडाउन झाल्यानंतर दुधाची मागणी कमी झाली...
पशुखाद्य दरात वाढसांगली ः अतिवृष्टीमुळे पशुखाद्य तयार होणाऱ्या...
दुग्ध व्यवसायातून अल्पभूधारक शेतकऱ्याची...वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये कुटुंबाचा...
पशुपालनाने दिली आर्थिक प्रगतीला साथकोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील देवानंद...
तोतया व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची...नाशिक : सध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची...
गांडूळ खताने घातले उत्पन्नवाढीस खतपाणीसासवड, जि. पुणे ः वीटभट्टीच्या धंद्यात उधारी...
नियमित कर्जफेड करणारे शेतकरी...कोल्हापूर ः जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार नियमित...
ग्रामीण भागात नऊ लाख घरे बांधणार ः हसन...मुंबई : राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच...
विदर्भाच्या काही भागांत थंडीपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले...
कारखाने भाडेतत्त्वावर देणाऱ्या समितीत...पुणे : आजारी साखर कारखाने व त्यांच्या अब्जावधी...