जालना, धरणगाव येथे कापूस उत्पादकांसाठी मेळावे

जालना, धरणगाव येथे कापूस उत्पादकांसाठी मेळावे
जालना, धरणगाव येथे कापूस उत्पादकांसाठी मेळावे

पुणे ः कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता कशी सुधारू शकतो, बोंड अळीचे व्यवस्थापन कसे करावे, कापसाला अधिक किंमत कशी मिळवू शकतो, याबाबत मार्गदर्शनासाठी उद्या (ता. १) जालना आणि २ ऑगस्ट रोजी धरणगाव येथे कॉटनगुरू व एम. सी. एक्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कापूस उत्पादक शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

मागील वर्षी गुलाबी बोंड अळीने महाराष्ट्रात आणि इतर राज्यात थैमान घातले. त्यामुळे अतोनात नुकसान झाले होते. कॉटनगुरूने या वर्षी देखील गुलाबी बोंड अळी येण्याची शक्यता आधीच वर्तवलेली होती, जी खरी ठरली आहे. त्यावर कसे नियंत्रण आणि उपाय करता येतील यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी लक्ष्मी कॉटस्पिन लि. गट क्रमांक ३९९, सामणगाव-कजला रोड, मीनाताई ठाकरे वृद्धाश्रमासमोर, जालना येथे मेळावा होणार अाहे, तर २ ऑगस्ट रोजी श्रीजी जिंनिग ॲण्ड प्रेसिंग फॅक्टरी, गट क्रमांक ४६३, जळगाव रोड, धरणगाव, जि. जळगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही मेळाव्यांची वेळ सकाळी १० ते दुपारी ०१ असून, कार्यक्रमानंतर  उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे.

कॉटनगुरू मनीष डागा हे कापसाच्या मार्केटिंगवर मार्गदर्शन करतील,  अमृतराव देशमुख हे गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण आणि उपाय यावर मार्गदर्शन करतील. एम. सी. एक्स. बद्रृद्दीन खान हे कापसाच्या भविष्यातील किमतीवर मार्गदर्शन करतील, श्री जी जिनिंग ॲण्ड प्रेसिंग फॅक्टरी आणि लक्ष्मी कॉटस्पिन लिमिटेड हे खरीदाराच्या काय अपेक्षा ज्या पूर्ण झाल्यावर ते कापसाला जादाचे भाव देऊ शकतील यावर मार्गदर्शन करतील. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती कॉटनगुरू मनीष डागा यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com