पुणे ‘झेडपी’च्या आरोग्य विभागात मेगाभरती

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार आहे. यानुसार या विभागातील १ हजार ५२१ रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे.
पुणे ‘झेडपी’च्या आरोग्य विभागात मेगाभरती Mega recruitment in the health department of Pune 'ZP'
पुणे ‘झेडपी’च्या आरोग्य विभागात मेगाभरती Mega recruitment in the health department of Pune 'ZP'

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार आहे. यानुसार या विभागातील १ हजार ५२१ रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी येत्या ४ ते ७ एप्रिल या कालावधीत थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. 

या बाबतची जाहिरात पुणे जिल्हा परिषदेच्या  https://punezp.mkcl.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रिक्त पदांमध्ये विशेषतज्ज्ञ (फिजिशियन), भूलतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी (ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक), दंतरोगतज्ज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक, स्टाफ नर्स, एएनएम, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, डेटा एन्ट्री ऑपरेटर आदींचा समावेश आहे. 

ही सर्व पदे कोरोना प्रतिबंधासाठी सुरू करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड आरोग्य केंद्र आणि समर्पित कोविड रुग्णालयासाठी किमान तीन महिने कालावधीसाठी (आवश्यकतेनुसार कालावधी वाढवणार) कंत्राटी पद्धतीने किंवा मानधन तत्त्वावर भरण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी सांगितले. 

या साठी एम.डी. (मेडिसिन), एम.डी. किंवा डी.एन.बी. (ॲनेस्थेशिया), एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.डी.एस., जी.एन..एम किंवा बी एस्सी (नर्सिंग), ए.एन.एम., क्ष-किरण तंत्रज्ञ अभ्यासक्रम उत्तीर्ण, बी. एस्सी, डी.एम.एल.टी., डी. फार्मसी, बी.फार्मसी आणि पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. 

मुलाखतीसाठी आवश्‍यक कागदपत्रे 

  •    वयाचा पुरावा. 
  •   पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र. 
  •    रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र. 
  •   अनुभव प्रमाणपत्र. 
  •    रहिवासी प्रमाणपत्र. 
  •    जातीचे प्रमाणपत्र. 
  •    एक छायाचित्र.
  • पदनिहाय रिक्त जागा     

  • वैद्यकीय अधिकारी (सर्व मिळून)    ५३७ 
  • स्टाफ नर्स (परिचारिका)     ४३४
  • ए.एन.एम.    २९० 
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ     १७ 
  • ई.सी.जी. तंत्रज्ञ     २४ 
  • क्ष-किरण तंत्रज्ञ      १५ 
  • रुग्णालय व्यवस्थापक    २७ 
  • औषधनिर्माता     ३७ 
  • भूलतज्ज्ञ    २२ 
  • फिजिशियन     १६
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com