म्हैसाळचे आवर्तन कवठेमहांकाळ तालुक्यात पोचले

The mehassal period reached the taluka of Kavateh
The mehassal period reached the taluka of Kavateh

सांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे अठरा पंप सुरू करून पाणी कवठेमहांकाळ तालुक्यात पोचले आहे. म्हैसाळ योजनेचे पंप धीम्या गतीने का असेना वाढविण्यात येत आहेत. कवठेमहांकाळ, जत आणि तासगाव तालुक्यातील शेतकरी व जनता चातकाप्रमाणे वाट पाहत असताना अखेर पाणी पुढे मुख्य दुष्काळी भागात सरकू लागल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

म्हैसाळ योजनेचे पाणी सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतीला पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता सध्या योजनेच्या मुख्य कालव्यातूनच पाणी पुढे जात आहे. त्यामुळे मुख्य कालव्यालगत असलेल्या लाभ क्षेत्राला पाणी मिळते आहे. पाणी मागणी अर्जांची संख्या ८१ हजार हेक्टरपैकी केवळ ५०० हेक्टरपर्यंत इतके कमी असल्याने अद्याप कोणतेही शाखा कालवे सुरू केले नाहीत, असे दिसत आहे. त्यामुळे मुख्य कालव्यातून वाहणारे पाणी जत तालुक्यात जाईपर्यंत शाखा कालवे सुरू होणार की नाही? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

मिरज पूर्व भागात पाणीटंचाई मिरज पूर्व भागातील खटाव, लक्ष्मीवाडी, बेळंकी, चाबुकस्वारवाडी येथे शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यातून वाहणारे पाणी स्रोतांत सोडल्याशिवाय भागातील नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला पाझर फुटणार नाहीत.

गळतीवर नियंत्रण यंदा पावसाळ्यात उशिराने झालेला मोठा पाऊस यामुळे म्हैसाळ योजनेचे आरग, बेडग, सलगरे, बेळंकी येथील मुख्य कालव्याची गळती काढण्याचे मोठे काम सुरू होते त्यातील बहुतांश दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता गळतीवर नियंत्रण आल्याचे दिसत असून शाखा कालव्यात पाणी आल्याशिवाय भागातून मुख्य कालव्यातून पाणी पुढे जाऊनही त्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लाभही होणार नाही असे चित्र यंदा तयार झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com