मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी बनविले वनराई बंधारे

मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी बनविले वनराई बंधारे
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी बनविले वनराई बंधारे

अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. सद्य:स्थितीत पाऊस उघडला असून सर्वत्र नाले खळखळ वाहत आहेत. याच पाण्याचा उपयोग शेतीसाठी करण्यासाठी कृषी विभागाने वनराई बंधाऱ्याची मोहीम हाती घेतली आहे. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी १५ पेक्षा अधिक बंधारे तयार करून पाणी अडविले आहे.  सध्या सोयाबीनचा हंगाम चालू असल्यामुळे लोकसहभाग तितका मिळत नाही. परंतु, मेहकर (जि. बुलडाणा) तालुक्यातील कृषी सहायक स्वतः मेहनत घेऊन गावोगावी वनराई बंधारे तयार करीत आहे. या बंधाऱ्यामुळे शून्य खर्चात शेतीस पाणी उपलब्ध होणार. आतापर्यंत या तालुक्यात कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतः मेहनत करून १५ हून अधिक बंधारे बनविले आहेत. कृषी सहायक विठ्ठल धांडे (विश्वी), एस. व्ही. गायकवाड (भोसा) यांनी गारखेड येथील शेतकरी दामोधर विष्णू शेळके या शेतकऱ्याच्या मदतीने त्यांच्या शेताजळ वनराई बंधारा बनविला आहे. या बंधाऱ्यामुळे त्यांचे रब्बी हंगामात अडीच एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी तालुका कृषी अधिकारी सत्येंद्र चिंतलवाड हे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com