Agriculture news in marathi; In the Mehkar taluka, the forest workers were built by agricultural workers | Agrowon

मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी बनविले वनराई बंधारे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. सद्य:स्थितीत पाऊस उघडला असून सर्वत्र नाले खळखळ वाहत आहेत. याच पाण्याचा उपयोग शेतीसाठी करण्यासाठी कृषी विभागाने वनराई बंधाऱ्याची मोहीम हाती घेतली आहे. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी १५ पेक्षा अधिक बंधारे तयार करून पाणी अडविले आहे. 

अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. सद्य:स्थितीत पाऊस उघडला असून सर्वत्र नाले खळखळ वाहत आहेत. याच पाण्याचा उपयोग शेतीसाठी करण्यासाठी कृषी विभागाने वनराई बंधाऱ्याची मोहीम हाती घेतली आहे. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी १५ पेक्षा अधिक बंधारे तयार करून पाणी अडविले आहे. 

सध्या सोयाबीनचा हंगाम चालू असल्यामुळे लोकसहभाग तितका मिळत नाही. परंतु, मेहकर (जि. बुलडाणा) तालुक्यातील कृषी सहायक स्वतः मेहनत घेऊन गावोगावी वनराई बंधारे तयार करीत आहे. या बंधाऱ्यामुळे शून्य खर्चात शेतीस पाणी उपलब्ध होणार. आतापर्यंत या तालुक्यात कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतः मेहनत करून १५ हून अधिक बंधारे बनविले आहेत.

कृषी सहायक विठ्ठल धांडे (विश्वी), एस. व्ही. गायकवाड (भोसा) यांनी गारखेड येथील शेतकरी दामोधर विष्णू शेळके या शेतकऱ्याच्या मदतीने त्यांच्या शेताजळ वनराई बंधारा बनविला आहे. या बंधाऱ्यामुळे त्यांचे रब्बी हंगामात अडीच एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी तालुका कृषी अधिकारी सत्येंद्र चिंतलवाड हे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. 

इतर बातम्या
शिवसेनेचा दावा; सत्तास्थापनेचा पेच कायममुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे...
संपूर्ण पीक कर्ज माफ करून पीकविमा सक्षम...नाशिक  : ‘नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
साखर निर्यातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढकोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ...