agriculture news in marathi Melons cost Rs. 500 to Rs. 2000 in the state | Agrowon

राज्यात खरबूज ५०० ते २००० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 मार्च 2021

अकोलाः येथील बाजारात खरबुजाची दररोज १५ ते २० टनांची आवक होत आहे. सरासरी दर १००० रुपयांपासून तर १८०० रुपयांपर्यंत मिळत आहे.

अकोल्यात क्विंटलला १००० ते १८०० रुपये

अकोलाः येथील बाजारात खरबुजाची दररोज १५ ते २० टनांची आवक होत आहे. सरासरी दर १००० रुपयांपासून तर १८०० रुपयांपर्यंत मिळत आहे.

पावसाळी वातावरण आठवडाभर राहिल्याने मागणीत घट आली होती. मात्र, आता वातावरण निवळले आहे. खरबुजाची मागणी वाढेल, अशी आशा विक्रेत्यांनी व्यक्त केली.

टरबूज, खरबूज विक्रीसाठी अकोल्याची बाजारपेठ महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे दररोज शेकडो क्विंटल या फळांची विक्री होत असते. सध्या खरबुजाचा हंगाम सुरू आहे. जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांसह आनंदपूर भागातून या ठिकाणी आठ ते दहा गाडी खरबूज विक्रीसाठी येत आहे. 

गुरुवारी हजार रुपयांपासून १८०० पर्यंत दर मिळाला. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर मागणीला उठाव येतो. तेव्हा या दरांमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. त्यातच काही भागात गारपिटीमुळे या फळांना इजा झाल्याने आवकेवरही परिणाम संभवतो. यामुळे दर वाढीला आधार दिसत आहे.

पुण्यात क्विंटलला १२०० ते १५०० रुपये

पुणे ः वाढत्या उन्हाळ्यामुळे गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरबुजाची आवक वाढू लागली आहे. गुरुवारी (ता.२५) खरबुजाची सुमारे ३० टेम्पो आवक झाली होती. यावेळी आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने प्रति किलोला १२ ते १५ रुपये दर होता. 

खरबुजाची आवक ही प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, बारामतीसह सोलापूर जिल्ह्यातून होत आहे. गेल्या आठवड्यात आवक आणि दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये क्विंटलला ९०० ते १५०० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२४) खरबुजाची आवक २२० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ९०० ते कमाल १५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० रुपये होते. सध्या आवक सर्वसाधारण आहे. मागणी वाढत आहे. मात्र अद्याप दर कमीच आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शनिवारी (ता.२०) आवक १०० क्विंटल झाली. त्यास ९०० ते २२०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० रुपये होता. शुक्रवारी (ता.१९) आवक २९० क्विंटल झाली. त्यास ५०० ते ९००, तर सर्वसाधारण दर ७०० रुपये होता. गुरुवारी (ता.१८) खरबुजाची आवक ५२ क्विंटल झाली. त्यास ९०० ते १८०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १४०० राहिला. गत सप्ताहात आवक सर्वसाधारण होती. मात्र आवकेत हळूहळू वाढ होत आहे.

आवक कमी जास्त असल्याने मागणीनुसार दरात चढ उतार होत असल्याचे दिसून आले. मंगळवारी (ता.२३) व सोमवारी (ता.२२) आवक  झाली नाही. तर रविवारी (ता.२१) फळ बाजार बंद होता.

जळगावात क्विंटलला११०० ते १५०० रुपये

जळगाव ः जिल्ह्यात खरबुजाची आवक बाजार समित्यांमध्ये अत्यल्प होत आहे. लागवड बऱ्यापैकी झाली आहे. सध्या काढणीला सुरवात होत आहे. सुरवातीलाच किमान ११ व कमाल १५ रुपये प्रतिकिलोचा दर थेट शिवारात शेतकऱ्यांना मिळत आहे. 

दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब भागातील मोठे खरेदीदार धुळे, शिरपूर, शहादा, रावेर, यावल भागातील एजंटच्या मदतीने खरबुजाची खरेदी करीत आहेत. सध्या जिल्ह्यात गेल्या सात - आठ दिवसांपासून प्रतिदिन सरासरी चार ट्रक (एक ट्रक नऊ टन क्षमता) कलिंगडाची आवक होत आहे. सुरवातीला दर बऱ्यापैकी मिळत आहेत, परंतु पुढे आवक वाढेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

परभणीत क्विंटलला ८०० ते १५०० रुपये  

परभणी ः  येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये बुधवारी (ता.२४) खरबुजाची ७०० क्विंटल आवक होती. खरबूजाला प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल १५०० रुपये, तर सरासरी ११५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून दररोज ७०० ते ८०० क्विंटल खरबुजाची आवक होत आहे. गेल्या आठवडाभरात प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.२४) खरबुजाची ७०० क्विंटल आवक झाली. घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ९०० रुपये दर 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) खरबुजाची १२० क्विंटल आवक झाली. त्यास क्विंटलला ५०० ते ९०० रुपये दर मिळाला. सरासरी दर ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १८ मार्च रोजी खरबुजाची ३२ क्विंटल आवक झाली. त्या वेळी १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. सरासरी दर १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. सोमवारी (ता. २२) बाजार समितीमध्ये १३५ क्विंटल आवक झालेल्या खरबुजाला सरासरी ८०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. मंगळवारी (ता.२३) ८८ क्विंटल आवक झाली. त्या वेळी खरबुजाचे सरासरी दर ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

बुधवारी (ता.२४) खरबुजाची आवक १०९ क्विंटल, तर दर ५०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. सरासरी ८५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.

नगरमध्ये क्विंटलला ५०० ते २००० रुपये 

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत खरबुजाची दर दिवसाला ११ ते २० क्विंटलची आवक होत आहे. येथे प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळत आहे. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत खरबुजाची आवक वाढत आहे. २२ मार्च रोजी ११ क्विंटलची आवक होऊन १००० ते १५०० व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. २० मार्च रोजी १० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १८०० व सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...