येलदरी स्मृतिवनात जपता येणार आठवणी

पुसद, जि. यवतमाळ ः प्रत्येकाच्या कुटुंबात काही क्षण आनंदाचे तर काही दुःखाचे असतात. या क्षणांना आठवणीत कायम गुंतून ठेवण्यासाठी पुसद वनविभागाच्या वतीने येलदरी जंगल परिसरात ‘स्मृतिवन’ साकारण्यात येत आहे. उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या संकल्पनेतील या स्मृतिवनात सोमवारी (ता. ६) निसर्गप्रेमींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला.
Memories can be preserved in the Yeldari Memorial

पुसद पासून पाच किलोमीटर अंतरावर खंडाळा-येलदरी सागवृक्षराजीचा विलोभनीय परिसर आहे. राज्य मार्गाला लागूनच तीन हेक्टर क्षेत्रात या निसर्गरम्य स्मृतिवनाची निर्मिती होत आहे. या येलदरी पठाराला तीनही बाजूला दरी असून त्यावर १ हजार ८०० वड, पिंपळ, जांभूळ, उंबर, चिंच अशा विविध प्रजातीचे वृक्ष लावण्यासाठी खड्डे तयार करण्यात आले आहे. त्यासाठी आठ खंडांची व्यवस्था आहे. एखाद्या कुटुंबात बाळाचा जन्म झाला असेल, कुणाचे लग्न वा परीक्षेतील नेत्रदीपक यश असा आनंद प्रसंग या स्मृतिवनात आवडेल ते रोपटे लावून साजरा करता येईल. कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांची स्मृती वृक्षारोपणातून जपता येणार आहे, असे मुंढे यांनी सांगितले.

या स्मृतिवनात रोपटे लागवडीच्या प्रारंभाला उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, पुसदच्या माजी नगराध्यक्ष डॉ. माधवी गुल्हाने, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे संचालक अनिरुद्ध पाटील, विजय जाधव तसेच डॉ. अमोल मालपाणी, डॉ. शैलेंद्र नवथडे, बाबूसिंग आडे, शैलेश कोटुरवार, अविनाश कांबळे यांनी कुटुंबातील आनंद व स्मृतिक्षण जपण्यासाठी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com