Agriculture news in marathi Merchants, farmers' dilemmas | Agrowon

व्यापारी, अडत्यांकडून शेतकऱ्यांची कोंडी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 एप्रिल 2021

दादर ज्वारीची मळणी पूर्ण झाली आहे. पण आवक वाढताच दादर ज्वारीचे दर व्यापारी, अडतदारांनी पाडले आहेत. या बाबत शेतकऱ्यांनी चोपडा, अमळनेर, जळगाव बाजार समितीत नाराजी व्यक्त केली आहे. 

जळगाव : खानदेशात दादर ज्वारीची मळणी पूर्ण झाली आहे. पण आवक वाढताच दादर ज्वारीचे दर व्यापारी, अडतदारांनी पाडले आहेत. या बाबत शेतकऱ्यांनी चोपडा, अमळनेर, जळगाव बाजार समितीत नाराजी व्यक्त केली आहे. बाजार समित्यांमध्ये प्रशासन लक्ष देत नाही, व्यापारी मनमानी करतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे 
आहे. 

दादरची पेरणी खानदेशात यंदा वाढली आहे. सकस चारा व दर्जेदार धान्य मिळत असल्याने दादर ज्वारीचे पेरणी वाढली आहे. मका, संकरित ज्वारी ऐवजी दादर ज्वारीच्या विद्यापीठातर्फे संशोधित वाणांची पेरणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. 

दादर ज्वारीचे दर मार्च महिन्याच्या सुरवातीला २४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल होते. सुरुवातीला जळगाव बाजार समितीत प्रतिदिन ५०० ते ६०० क्विंटल आवक सुरू होती. परंतु या आठवड्यात आवक प्रतिदिन १५०० क्विंटलवर पोचली आहे. चोपडा, अमळेरातही आवक वाढली आहे.  आवक वाढताच किमान दर १८०० व कमाल दर २५०० एवढा झाला. फक्त काही शेतकऱ्यांच्या दादर ज्वारीला ३३०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. सरासरी दर २२०० रुपये प्रति क्विंटल झाला. मध्यंतरी या प्रकाराबाबत जळगाव बाजार समितीमध्ये काही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली होती. परंतु प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली 
नाही. 

चोपडा, जळगाव बाजार समितीत काही अडतदार एकी करून एकच दर लिलावात जाहीर करीत आहेत. तर काही अडतदार लिलावात सहभागीच होत नाहीत. आम्हाला लिलावात येण्याची गरज नाही, अशी अरेरावी देखील अडतदार, खरेदीदार करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. आवक वाढत आहे. कोरोनाचे संकटही आहे, अशा स्थितीत शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. यावर जिल्हा उपनिबंधक, प्रशासनाने अडतदार, शेतकरी यांची बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अन्यथा या मुद्द्यावरून चोपडा, अमळनेर व जळगावात संतप्त शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा देखील देण्यात आला आहे.


इतर बातम्या
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
दिग्गज प्रस्थापितांमध्ये रंगणार ‘गोकुळ’...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
‘शेती’वरही निर्बंध; दुकाने फक्त 'या'...पुणे : कोरोना विषाणूच्या जीवघेण्या साथीला पायबंद...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
मोसंबीच्या वाण निवडीसाठी संशोधन...औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांना सध्या अस्तित्वात...
जगाची ‘फळांची करंडी’ होण्याची...पुणे ः ‘घरी ज्याच्या फळांची करंडी तोची असे खरा...
कोकणात बांधावरच्या पिकांची होणार...पुणे : कोकणातील दुर्लक्षित परंतु येत्या काळात...
विदर्भात आजपासून पावसाची शक्यतापुणे : विदर्भाच्या अनेक भागांत अंशतः ढगाळ...
राज्यात अद्याप ३६ कारखान्यांचा हंगाम...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात हुपरी (ता. हातकणंगले...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...