पारा घसरला, गारठा वाढला

राज्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असल्याने गारठा वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक घसरले आहे.
Mercury dropped, hail increased
Mercury dropped, hail increased

पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असल्याने गारठा वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक घसरले आहे. यातच पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता. ३०) कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट झाली आहे. तर निरभ्र आकाशामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरू असून कोकणासह, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असला तरी गारठा चांगलाच वाढला आहे. 

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील ब्रह्मपुरी, नागपूर, यवतमाळ या ठिकाणी तापमानाचा पारा १५ अंशांपेक्षाही खाली आला आहे. शुक्रवारी (ता. २९) नाशिक येथे राज्यातील नीचांकी १३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  किमान तापमानात घट होत असतानाच कमाल तापमानात देखील वाढ झाली आहे. दुपारी उन्हाचा जाणवत असून, शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६.४ अंश तापमानाची नोंद झाली.

शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.९ (१४.९), नगर ३०.२ (१८.८), जळगाव ३१.६(१४.४), कोल्हापूर ३१.२ (२०.७), महाबळेश्‍वर २४.८(१४), मालेगाव ३३ (१८.४), नाशिक २९.९ (१३.१), सांगली ३२.६ (२१), सातारा ३०.१ (१८.६), सोलापूर ३३ (१८), सांताक्रूझ ३४.८(२४.२), अलिबाग ३५.६ (२१.४), डहाणू ३४ (२१.६), रत्नागिरी ३६.४ (२२.७), औरंगाबाद २९.६ (१३.५), नांदेड ३१.६(१७.०), उस्मानाबाद - (१५), परभणी ३०.५ (१५), अकोला ३१.४ (१५.१), अमरावती ३१.४ (१५.१), ब्रह्मपुरी ३३ (१४.९), बुलडाणा ३०.५ (१५.२), चंद्रपूर ३२.८ (१९.२), गडचिरोली ३२.४(१९.०), गोंदिया ३०.८ (१७), नागपूर ३१.३ (१४.३), वर्धा ३१.२ (१५.८), वाशीम ३१ (१९), यवतमाळ ३१.५ (१४.५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com