Agriculture news in marathi Mercury will rise further in April, May | Page 2 ||| Agrowon

एप्रिल, मेमध्ये पारा आणखी वाढणार 

संदीप नवले
बुधवार, 7 एप्रिल 2021

गेल्या एक महिन्यापासून राज्यातील अनेक भांगात उन्हाचा कडाका वाढला आहे. राज्याच्या पश्‍चिमेकडे असलेल्या कोकण विभागात चालू एप्रिल मे या दोन महिन्यांत तापमानाचा पारा वाढणार आहे. अनेक ठिकाणी पारा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

पुणे : गेल्या एक महिन्यापासून राज्यातील अनेक भांगात उन्हाचा कडाका वाढला आहे. राज्याच्या पश्‍चिमेकडे असलेल्या कोकण विभागात चालू एप्रिल मे या दोन महिन्यांत तापमानाचा पारा वाढणार आहे. अनेक ठिकाणी पारा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्या, तरी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान जूनमध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता वर्तविली आहे. 

भारतीय हवामान विभागाने चालू उन्हाळ्यातील एप्रिल ते जून या तीन महिन्यांतील कमाल आणि किमान तापमानाचा अंदाज नुकताच जाहीर केला आहे. या जाहीर केलेल्या अंदाजानुसार चालू उन्हाळ्यात उत्तर, वायव्य आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढणार आहेत. तसेच पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा, छत्तीसगडसह पश्‍चिम किनाऱ्यावरील कोकण, गोव्यात कमाल तापमान सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता अधिक आहे. 
कोकण-गोवा विभागात कमाल तापमानाचा पारा अधिक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत २०१६ पासून उन्हाळा आणि हिवाळा हंगामात उपविभागनिहाय तापमानाचा अंदाज जाहीर केला जातो. मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिम प्रारूपाच्या (मॉडेल) आधारे हवामान विभागाने एप्रिल ते जून २०२१ या तीन महिन्यांतील तापमानाचा अंदाज वर्तविला आहे. 

हवामान विभागाच्या या अंदाजानुसार उत्तर, वायव्य, ईशान्य भारतातील सर्वच विभागांसह, पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीय भाग, पश्‍चिम किनाऱ्यावरील गुजरात, सौराष्ट्र, कोकण-गोवा या विभागात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारतासह लगतच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या मध्य भारतातील विभागात दिवसा कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे. 

एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीतील किमान तापमानाचा विचार करता, हिमालय पर्वताचा पायथ्यासह उत्तर भारत, वायव्य भारत, मध्य भारताचा पश्चिम भाग (कोकण-गोवा), दक्षिण भारताच्या किनारपट्टीय भागात किमान तापमान सरासरीच्यावर राहणार आहे. तर पूर्व, मध्य भारतातील बहुतांशी विभागांसह, जम्मू- काश्मीर राज्यात रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

प्रशांत महासागरात ला-निना स्थिती 
मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राचे पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी असून, या भागात सध्या मध्यम ला-निना स्थिती आहे. उन्हाळ्यातही या भागात ला-निना स्थिती टिकून राहण्याचे संकेत आहे. मात्र येत्या काळात या भागातील तापमानात वाढ झाल्यास त्याचे परिणाम देशातील व 
राज्यातील तापमानावर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...