मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
झेंडू उत्पादक प्रतिकूल हवामानामुळे धास्तावले
माझा अर्धा एकरातील झेंडू अचानक करपून गेला. उत्पादन खर्चही निघाला नाही. सध्या बदलत्या हवामानामुळे हे पीक वाचवायचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे.
- पांडुरंग पुजारी, झेंडू उत्पादक.
ढेबेवाडी, जि. सातारा : पावसाळी हवामान, सकाळी पडणारे दाट धुके यामुळे विभागातील झेंडू उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. काही ठिकाणी झेंडूची शिवारे फुलांनी बहरली असली तरी, काही ठिकाणी मात्र त्यावर परिणाम झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
मुंबईसह स्थानिक बाजारपेठेत शेतकरी झेंडू विक्रीसाठी पाठवतात. या परिसरातून दररोज मुंबईला जाणाऱ्या लक्झरी बसचा मुंबई बाजारपेठेत शेतीमाल पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगला उपयोग होत आहे. दररोज सायंकाळी झेंडू भरलेली पोती येथून मुंबईला पाठवली जातात. सकाळी तेथील व्यापारी ती उतरून घेऊन दरानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर पैसे जमा करतात. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असा मागणीचा हंगाम साधत झेंडू उत्पादक शेतकरी पिकाचे नियोजन करत असतात. कधी हंगाम चांगला साधतो, तर कधी उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे तोटा सहन करावा लागतो, असा त्यांचा दर वर्षीचा अनुभव आहे.
या वर्षीही झेंडूच्या दरातील चढ-उतारामुळे पदरात काही पडत नसल्याच्या प्रतिक्रिया येत असतानाच ऐन सणासुदीच्या काळात काही शेतकऱ्यांची झेंडूची शिवारे करपून गेल्याने तोंडचा घास हिरावल्यासारखी त्यांची स्थिती झाली आहे. मशागत, रोपांची खरेदी, फवारणी, वाहतूक खर्च याचा विचार करता आर्थिक फटका बसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगत आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबई बाजारपेठेत झेंडूला अपेक्षित दर मिळाला नाही. दसऱ्यालाही स्थानिक बाजारात आवक वाढल्याने दरांवर परिणाम झाला. पावसाळी वातावरण, सकाळी पडणारे दाट धुके याचा फटका झेंडूला बसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दिवाळी तोंडावर असल्याने तोपर्यंत तरी झेंडू किडी-रोगांपासून वाचवून ठेवण्याचे आव्हान येथील शेतकऱ्यांसमोर आहे.
- 1 of 1022
- ››