मसाल्यातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती 

बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मसाल्यांमध्ये होणारी भेसळ कशी केली जाते आणि भेसळ ओळखण्याच्या पद्धतीची माहिती घेऊ.
Methods of detecting adulteration in spices
Methods of detecting adulteration in spices

बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मसाल्यांमध्ये होणारी भेसळ कशी केली जाते आणि भेसळ ओळखण्याच्या पद्धतीची माहिती घेऊ. चांगल्या प्रतीच्या मालामध्ये इतर अनावश्‍यक घटक मिसळणे किंवा त्यातील चांगले घटक काढून मालाचा दर्जा कमी करणे म्हणजेच भेसळ होय. कोणत्याही पदार्थाला रुचकर आणि चविष्ट बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक मसाला असतो. मसाल्याचे पदार्थ प्रामुख्याने अन्नाला चव, सुगंध, रंग देण्यासाठी उपयुक्त असतात. मात्र, बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मसाल्यांमध्ये होणारी भेसळ कशी केली जाते आणि भेसळ ओळखण्याच्या पद्धतीची माहिती घेऊ. भेसळ ओळखण्यासाठी पद्धती  हिंग  राळे ची भेसळ  थोडे हिंग स्टेनलेस स्टीलच्या चमच्यात घेऊन आगीच्या संपर्कात न्यावे. शुद्ध हिंग कापराप्रमाणे जळते. मात्र, भेसळयुक्त हिंग कापराच्या ज्योतीसारखे जळत नाही. स्टार्चची भेसळ  थोड्याशा हिंगामध्ये आयोडीनचे काही थेंब टाकावेत. पदार्थात भेसळ असल्यास निळा रंग येतो. छोटे दगड किंवा इतर अनावश्‍यक घटक  एका ग्लासमध्ये थोडे हिंग आणि पाणी घेऊन चांगले हलवून घ्यावे. त्यामध्ये भेसळ असल्यास, छोटे दगड किंवा इतर घटक ग्लासच्या तळाला जातात. काळीमिरी  पपईच्या बी ची भेसळ 

  • एका काचेच्या ग्लासात थोडी काळीमिरी घ्या. शुद्ध काळीमिरी ग्लासात तळाला जाते तर पपईची बी पाण्यामध्ये तरंगते.
  • पांढऱ्या कागदावर काळीमिरी पसरून काचेच्या भिंगाने निरीक्षण करावे. काळीमिरी रंग तपकिरी आणि सुरकुतलेला पृष्ठभाग असतो. पपईची बी अंडाकृती आकाराची आणि गुळगुळीत पृष्ठभागाची असते.
  • काळीमिरी चवीवरून देखील ओळखता येते.
  • हलक्या काळ्या रंगाच्या बेरींची भेसळ  काळ्या मिरीमध्ये त्याच रंगाच्या पण वजनाने हलक्या असणाऱ्या काळ्या बेरीची भेसळ केली जाते. काळ्या बेरी बोटाने थोडे दाबून पहावे. भेसळ असल्यास लगेच तुटतील पण काळीमिरी तुटणार नाही. खनिज तेलाचा लेप  भेसळ करण्यासाठी काळीमिरीला खनिज तेलाचा लेप दिला जातो. भेसळयुक्त काळी मिरीला रॉकेलचा वास येतो. त्यामुळे भेसळ सहज ओळखता येते. मिरची पावडर  कृत्रिम रंगाची भेसळ  एका ग्लासमध्ये थोडे पाणी घेऊन त्यावर मिरची पावडर टाकावी. कृत्रिम रंगाचा वापर केला असेल तर पाण्यामध्ये तो रंग दिसून येईल. धुळीची भेसळ  एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात मिरची पावडर टाकावी. मिरची पावडर ग्लासच्या तळाशी जाते. भेसळ असेल तर धूळ पाण्यावर तरंगते. लाकडाचा भुसा  एका ग्लासात पाणी घेऊन मिरची पावडर टाकावी. भेसळीसाठी लाकडाचा भुसा वापरला असल्यास तो पाण्यावर तरंगतो. लवंगामधून तेल काढून घेणे 

  • लवंगमधून तेल काढले असेल तर त्या कमी आकाराच्या आणि संकुचित स्वरूपाच्या दिसतात. तसेच त्यातून शुद्ध लवंग ला येणारा उग्र वास येत नाही.
  • थोडे पाणी घेऊन त्यात लवंग सोडावी. शुद्ध लवंगा तळाशी जातात तर भेसळयुक्त पाण्यावर तरंगताना दिसतात.
  • मिठामध्ये खडूची भेसळ  एक ग्लास पाण्यामध्ये चमचाभर मीठ घेऊन मिश्रण हलवून घ्यावे. त्यात भेसळ नसल्यास मीठ पाण्यामध्ये विरघळून जाते. मात्र, भेसळ असेल तर खडूच्या चुऱ्यामुळे पूर्ण मिश्रण पांढरे होऊन भेसळ पाण्याच्या तळला जाते. संपर्क ः डॉ. जाजू रामेश्‍वर, ९४२०४२२९८९ (अन्न व्यवसाय व्यवस्थापन विभाग, एम.जी.एम. अन्नतंत्र महाविद्यालय, जि. औरंगाबाद) डॉ. महेंद्र तोष्णीवाल (९८५०२२९९९४) (सी.एस.एम.एस.एस. आयुर्वेदिक महाविद्यालय, कांचनवाडी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com