agriculture news in marathi Methods of detecting adulteration in spices | Page 2 ||| Agrowon

मसाल्यातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती 

डॉ. जाजू रामेश्‍वर, डॉ. महेंद्र तोष्णीवाल
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मसाल्यांमध्ये होणारी भेसळ कशी केली जाते आणि भेसळ ओळखण्याच्या पद्धतीची माहिती घेऊ.

बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मसाल्यांमध्ये होणारी भेसळ कशी केली जाते आणि भेसळ ओळखण्याच्या पद्धतीची माहिती घेऊ.

चांगल्या प्रतीच्या मालामध्ये इतर अनावश्‍यक घटक मिसळणे किंवा त्यातील चांगले घटक काढून मालाचा दर्जा कमी करणे म्हणजेच भेसळ होय. कोणत्याही पदार्थाला रुचकर आणि चविष्ट बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक मसाला असतो. मसाल्याचे पदार्थ प्रामुख्याने अन्नाला चव, सुगंध, रंग देण्यासाठी उपयुक्त असतात. मात्र, बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मसाल्यांमध्ये होणारी भेसळ कशी केली जाते आणि भेसळ ओळखण्याच्या पद्धतीची माहिती घेऊ.

भेसळ ओळखण्यासाठी पद्धती 
हिंग 
राळे ची भेसळ 

थोडे हिंग स्टेनलेस स्टीलच्या चमच्यात घेऊन आगीच्या संपर्कात न्यावे. शुद्ध हिंग कापराप्रमाणे जळते. मात्र, भेसळयुक्त हिंग कापराच्या ज्योतीसारखे जळत नाही.

स्टार्चची भेसळ 
थोड्याशा हिंगामध्ये आयोडीनचे काही थेंब टाकावेत. पदार्थात भेसळ असल्यास निळा रंग येतो.

छोटे दगड किंवा इतर अनावश्‍यक घटक 
एका ग्लासमध्ये थोडे हिंग आणि पाणी घेऊन चांगले हलवून घ्यावे. त्यामध्ये भेसळ असल्यास, छोटे दगड किंवा इतर घटक ग्लासच्या तळाला जातात.

काळीमिरी 
पपईच्या बी ची भेसळ 

  • एका काचेच्या ग्लासात थोडी काळीमिरी घ्या. शुद्ध काळीमिरी ग्लासात तळाला जाते तर पपईची बी पाण्यामध्ये तरंगते.
  • पांढऱ्या कागदावर काळीमिरी पसरून काचेच्या भिंगाने निरीक्षण करावे. काळीमिरी रंग तपकिरी आणि सुरकुतलेला पृष्ठभाग असतो. पपईची बी अंडाकृती आकाराची आणि गुळगुळीत पृष्ठभागाची असते.
  • काळीमिरी चवीवरून देखील ओळखता येते.

हलक्या काळ्या रंगाच्या बेरींची भेसळ 
काळ्या मिरीमध्ये त्याच रंगाच्या पण वजनाने हलक्या असणाऱ्या काळ्या बेरीची भेसळ केली जाते. काळ्या बेरी बोटाने थोडे दाबून पहावे. भेसळ असल्यास लगेच तुटतील पण काळीमिरी तुटणार नाही.

खनिज तेलाचा लेप 
भेसळ करण्यासाठी काळीमिरीला खनिज तेलाचा लेप दिला जातो. भेसळयुक्त काळी मिरीला रॉकेलचा वास येतो. त्यामुळे भेसळ सहज ओळखता येते.

मिरची पावडर 
कृत्रिम रंगाची भेसळ 

एका ग्लासमध्ये थोडे पाणी घेऊन त्यावर मिरची पावडर टाकावी. कृत्रिम रंगाचा वापर केला असेल तर पाण्यामध्ये तो रंग दिसून येईल.

धुळीची भेसळ 
एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात मिरची पावडर टाकावी. मिरची पावडर ग्लासच्या तळाशी जाते. भेसळ असेल तर धूळ पाण्यावर तरंगते.

लाकडाचा भुसा 
एका ग्लासात पाणी घेऊन मिरची पावडर टाकावी. भेसळीसाठी लाकडाचा भुसा वापरला असल्यास तो पाण्यावर तरंगतो.

लवंगामधून तेल काढून घेणे 

  • लवंगमधून तेल काढले असेल तर त्या कमी आकाराच्या आणि संकुचित स्वरूपाच्या दिसतात. तसेच त्यातून शुद्ध लवंग ला येणारा उग्र वास येत नाही.
  • थोडे पाणी घेऊन त्यात लवंग सोडावी. शुद्ध लवंगा तळाशी जातात तर भेसळयुक्त पाण्यावर तरंगताना दिसतात.

मिठामध्ये खडूची भेसळ 
एक ग्लास पाण्यामध्ये चमचाभर मीठ घेऊन मिश्रण हलवून घ्यावे. त्यात भेसळ नसल्यास मीठ पाण्यामध्ये विरघळून जाते. मात्र, भेसळ असेल तर खडूच्या चुऱ्यामुळे पूर्ण मिश्रण पांढरे होऊन भेसळ पाण्याच्या तळला जाते.

संपर्क ः डॉ. जाजू रामेश्‍वर, ९४२०४२२९८९
(अन्न व्यवसाय व्यवस्थापन विभाग, एम.जी.एम. अन्नतंत्र महाविद्यालय, जि. औरंगाबाद)
डॉ. महेंद्र तोष्णीवाल (९८५०२२९९९४)
(सी.एस.एम.एस.एस. आयुर्वेदिक महाविद्यालय, कांचनवाडी)


इतर कृषी प्रक्रिया
गुणकारी अन् औषधी हरभरासाधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
जवस : एक सुपर फूडजवस  पिकाचा प्रत्येक भाग हा...
आरोग्यदायी गुलकंदगुलकंद हा गुलाब फुलाच्या पाकळ्यापासून बनविलेला...
अंबाडीपासून प्रक्रियायुक्त पदार्थअंबाडी ही भाजी म्हणून काही प्रमाणात खाल्ली जाते....
प्रक्रियायुक्त आहारासाठी भरडधान्य...भरड धान्यामध्ये एकूणच प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
करार शेती यशस्वी होण्यासाठी पारदर्शकता...बाजारपेठेच्या मागणीनुसार बदलण्यामध्ये आपल्या...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...
आहार अन्‌ प्रक्रिया उद्योगासाठी...भरड धान्ये इतर धान्यांच्या तुलनेने स्वस्त असतात....
काशीफळापासून रायता, सूप, हलवाकाशीफळामध्ये जीवनसत्त्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ...
अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन्...लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबी (मशरूम)...
पपईपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थपपई ही आरोग्यास पोषक असून, त्यापासून जाम, जेली,...
आवळा प्रक्रिया उद्योगातील संधीआवळा फळांमध्ये असणारे औषधी गुणधर्म व भरपूर...
गुलाबापासून गुलकंद, जॅम,जेलीगुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी...
फळे, भाजीपाल्याचे पूर्व शीतकरणपूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक...
मसाल्यातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये...
संत्र्याचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानसंत्रावर्गीय फळांचा आकर्षक रंग,स्वाद, चव टिकून...