अन्नधान्य साठवणुकीच्या पद्धती

शेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या किफायतशीर आणि पर्यावरणपूरक आहेत. घरगुती पातळीवर शेतीमालाच्या साठवणूकीसाठी या पद्धती अत्यंत उपयुक्त आहेत.
food grains storage methods
food grains storage methods

शेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या किफायतशीर आणि पर्यावरणपूरक आहेत. घरगुती पातळीवर शेतीमालाच्या साठवणूकीसाठी या पद्धती अत्यंत उपयुक्त आहेत.

पूर्वार्ध अन्नधान्य आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार (२०१६), घरगुती स्तरावर केलेल्या साठवणूकीतील अन्नधान्यांचे सुमारे ४० ते ५० टक्क्यापर्यंत नुकसान होते. यामुळे अन्नधान्यांच्या उत्पादनासाठी घेतलेली मोठी मेहनत वाया जाते. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही समस्या अत्यंत मोठी आहे. त्यामध्ये साठवणूकीतील किडीचा मोठा वाटा आहे. अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या प्रमुख कीडी  धान्यावर तांदळातील सोंड किडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इ. प्रादुर्भाव होण्याची प्रमुख कारणे

  • धान्याचे तापमान -  धान्यातील कीटक २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानात क्रियाशील राहू शकतात.
  • धान्यातील ओलावा -  ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
  • शेतातील प्रादुर्भाव -  काही कीटक शेतातच पक्व अवस्थेतील दाण्यांवर अंडी घालतात. अशा धान्याच्या साठवणीत पोषक हवामान मिळताच अळी बाहेर येते. धान्य खाण्यास सुरवात करते.
  • अस्वच्छता -  दरवर्षी वापरल्या जाणाऱ्या पोत्यांमध्ये कीटक व त्यांची अंडी तशीच राहून प्रादुर्भाव वाढू शकतो.
  • साठवणीच्या जागी भेगा व छिद्रे -  यामध्ये किडींना लपण्यासाठी, सुप्तावस्थेसाठी जागा मिळते. धान्याच्या वजनात घट, प्रत खालावणे व धान्यावर बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो. उगवणक्षमता कमी होऊन, बियाणे म्हणून वापरता येत नाही.
  • धान्य साठवणुकीच्या प्रमुख पद्धती

  • मातीची कोठी किंवा मातीची वाडगी : ग्रामीण व आदिवासी भागामध्ये बियाणे साठवणुकीसाठी प्रामुख्याने केला जातो. मात्र, पावसाळ्यात मातीची वाडगी ओलावा धरून ठेवतात. परिणामी कीड व बुरशीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो.
  • बांबूची शेणाने सारवलेली कणगी : आदिवासी भागामध्ये बांबूच्या कणग्यांचाही वापर धान्य साठवणीसाठी होतो. पावसाळ्यात किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो.
  • पक्की सिमेंट व पत्र्याची बांधलेली कोठी: अशा प्रकारच्या कोठयामध्ये किडींचा प्रदुर्भाव कमी प्रमाणात होते. त्यामुळे खर्चात बचत होते. बियाणे व बाहेरील हवामान यांचा संपर्क कमी येतो. बियाणे ठेवण्यास आणि काढण्यास अत्यंत सोपे जाते.
  • तागाची पोती वापरणे : धान्य, बियाणे साठवणीसाठी तागाची पोती किंवा गोण्याचा वापर प्रामुख्याने होतो. यातही पावसाळ्यात किडीचा प्रादुर्भाव होतो.
  • तयार केलेली पोती : सध्या उपलब्धता व स्वस्त असल्याने अशा पिशव्यांचा वापर वाढला आहे. मात्र, यात बियाणे जास्त काळासाठी साठवता येत नाही. अशा पिशव्यांमध्ये किडींचा व उंदरांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
  • प्लॅस्टिक पासून तयार केलेल्या पिशव्या : ही पद्धत कटक (ओरिसा) येथील राष्ट्रीय भात संशोधन संस्थेने शोधून काढली असून, त्यात ५० किलो पर्यंत बियाणे साठवता येते. यात किडींचा प्रादुर्भाव होत नाही.
  • प्लॅस्टिक धाग्यापासून तयार केलेली पोती : सध्या अशा प्रकारच्या पिशव्या बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात, परंतु या मध्ये बियाणे जास्त काळासाठी साठवून ठेवता येत नाही. किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो.
  • धान्याचे नुकसान कशाने होते?

  • दाण्यातील ओलावा व कुबट वास - २ ते ३ टक्के
  • बियाण्यातील विविध किडी - २.५ टक्के
  • उंदीर - २.५ टक्के
  • बुरशीजन्य रोग - २ ते ३ टक्के
  • बियाण्यातील ओलावा व कुबट वास  पावसाळ्यात बियाणाला पाणी लागल्याने ओलावा निर्माण होतो अशा प्रकारच्या बियाणे सडल्यामुळे त्यास कुबट वास येतो किंड व बुरशीना ओलाव्यामुळे वाढीस चालना मिळते. बियाणे साठवणुकीमधील एकात्मिक कीड नियंत्रण 

  • बियाण्यामधील पाण्याचे प्रमाण १० ते १२ टक्के ठेवावे.
  • पावसाचे पाणी साठवणीच्या ठिकाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • साठवण ठिकाणे साफ ठेवावीत.
  • पोती साठवणूक करताना जमिनीचा संपर्क येणार नाही अशा प्रकारे जमिनीपासून योग्य उंचीवर करावी.
  • बाजारामध्ये आता साठवणुकीत ठेवण्यासाठी कीड नियंत्रक सापळे उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा.
  • हवाबंद जागेमध्ये बियाणे साठवणूक केल्यास त्यामध्ये कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढते. किडींच्या वाढीसाठी आवश्यक ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कीड लागत नाही.
  • कडूनिंब आधारीत कीटकनाशक (निमतेल, निम अर्क या पैकी कोणतेही एक) २ मि.ली. प्रती किलो बियाण्यास चोळावे किंवा पोत्यावर बाहेरून फवारावे.
  • साठवणुकीची पोती, कणग्या, पक्की कोठारं, वाहतुकीची साधने किंवा भिंतीच्या फटी मधील किडींचा नाश करून घ्यावा. त्यासाठी जमिनी, भिंती व पक्की कोठारे यांच्या बाह्य बाजूने मेलॉथियान १० मि.लि. प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी उघडया बियाण्यावर करू नये. त्यानंतर बियाणे साठवणूक करावी.
  • पावसाळ्यात साठवणगृहे ही हवाबंद करून धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर करता येतो. साठवलेल्या बियाणांवर प्लॅस्टिक कागद किंवा ताडपत्रीने झाकून त्यात धुरीजन्य कीटकनाशकांच्या पुड्या फोडून ठेवाव्यात. हे झाकण ८-१० दिवस बंद ठेवावे.
  • संपर्क- हरिष अ. फरकाडे, ८९२८३६३६३८ ( सहायक प्राध्यापक - वनस्पती रोगशास्त्र विभाग, श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com