नाशिक विभागात 'मनरेगा'कडून ७५ हजार मजूरांना रोजगार

नाशिक विभागात वैयक्तिक स्वरुपाची ११,९७४ कामे सुरू आहेत. ४९ हजारावर मजूर कामावर आहेत. तर, सार्वजनिक स्वरुपाची १,१७७ कामे सुरू आहेत. तेथे सुमारे २७ हजार मजूर कामावर आहेत. कोरोनासारख्या संकटाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले असताना ग्रामीण भागासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. - डॉ. अर्जुन चिखले, उपायुक्त, रोजगार हमी योजना
MGNREGA provide work to 75,000 workers in lockdown in Nashik division
MGNREGA provide work to 75,000 workers in lockdown in Nashik division

नाशिक : लॉकडाउनमुळे रोजगाराचा मोठा फटका सर्वत्र बसला आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात रोजगाराची स्थिती गंभीर आहे. मात्र, नाशिक विभागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे ७५ हजार ९९७ मजूरांना रोजगार मिळाला आहे. या अडचणीच्या काळातही ग्रामीण भागात अनेक हात कामाला लागले आहेत. 

नाशिक विभागात ‘मनरेगा’अंतर्गत शेल्फवर ९८ हजार ८५१ कामे ठेवण्यात आली. १ लाखापेक्षा अधिक अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी करताच, त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. विभागातील एकूण ५,०७७ पैकी २,६०३ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत. शारीरिक अंतर ठेवण्यासह मास्क, रुमाल बांधून योग्य ती खबरदारी घेऊन सुरू आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कामावरील मजूर वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मनरेगा’द्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्त राजाराम माने, विभागाचे उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले यांच्याकडून विभागात जलसंधारण व गाळ काढण्याची अधिकाधीक कामे हाती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मजूरांना एका दिवसासाठी २३८ रुपये मजूरी देण्यात येते. जिल्ह्यात मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत १०० टक्के मजूरांच्या खात्यावर मजूरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.  ही आहेत कामे... 

सीसीटी, वनतळे, गाळ काढणे, रस्ते, घरकूल, मजगी, सलग समतल चर, दगडी बांध, माती बांध, रोपवाटिका, फळबाग लागवड, वनीकरण अशी कामे योजनेअंतर्गत आहेत. ग्रामविकास होण्यासह अनेक ठिकाणी सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे पाणी साठवण क्षमता वाढणार आहे.  जिल्हानिहाय मजूर स्थिती

जिल्हा सहभागी मजूर
नगर १०,३१० 
धुळे ११,०८० 
जळगाव ५,४४१ 
नाशिक २०,३४४
नंदुरबार २८,८०० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com