म्हैसाळचे आवर्तन पाच दिवसांत बंद होणार

म्हैसाळचे आवर्तन पाच दिवसांत बंद होणार
म्हैसाळचे आवर्तन पाच दिवसांत बंद होणार

सांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन योजना गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू आहे. या साडेतीन महिन्यांत सुमारे सहा टीएमसी पाणी उचलून शेतीला दिले आहे. हे आर्वतन येत्या चार ते पाच दिवसांत बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाई भासू लागली. त्यामुळे मिरज तालुक्यासह दुष्काळी पट्ट्यातील जत, कवठेमहंकाळ आणि तासगाव तालुक्यांतील शेतीच्या पाण्याची टंचाई वाढली होती. यामुळे शेतकऱ्यांनी योजना सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे ही योजना सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी आंदोलनेदेखील केली होती. मात्र, या आंदोलनाची दखल पाटबंधारे विभाग आणि लोकप्रतिनिधींनी घेतली नव्हती. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाला. 

त्यानंतर शासनाने मध्यस्‍थी करून ही योजना सुरू झाली. मात्र, या योजनेचे आवर्तन उशिरा सुरू झाले. परंतु, शेतकऱ्यांनी पैसे भरल्याशिवाय पाणी मिळणार नाही अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतील होती. यामुळेच म्हैसाळ उपसा सिंचनयोजनेची पाणीपट्टी गोळा करण्यास मदत झाली. कालांतराने पैसे घ्या पण पाणी द्या, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. यामुळे हे आर्वतन तीन महिन्यांहून अधिक सुरू राहिले.

या साडेतीन महिन्यांचा आर्वतन काळात कृष्णेचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यापर्यंत पोचले. दरम्यान, या आर्वतनासाठी कृष्णेतून सुमारे ५.७५ टीएमसी पाणी उचलण्यात आले. जत तालुक्यातील टप्पा क्रमांक सहा अ आणि ब या दोन योजनेतून पाणी सोडण्याची तपासणी सुरू आहे. येत्या दोन दिवसांत ही तपासणी पूर्ण होईल, अशी आशा पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. 

या आर्वतनात मिरज, जत, कवठेमहकांळ तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून ८१ः१९ या सूत्राप्रमाणे पाणीपट्टी वसूल झाली. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची आजअखरे अंदाजे तीन कोटी रुपये पाणीपट्टी वसूल झाली आहे. या योजनेच्या लाभक्षेत्रात साखर कारखाने आहेत. मात्र, हे साखर कारखाने पाणीपट्टी वसूल करण्यासाठी कोणतीही मदत करीत नाही. त्यामुळे पाणीपट्टीच्या थकबाकी वाढली आहे. तर महावितरणचे सुमारे ३२ कोटी रुपयांचे वीजबिल थकले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com