agriculture news in marathi, Mhaasal's extended plan will be completed : Fadanvis | Agrowon

म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार : फडणवीस
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 एप्रिल 2019

जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारी म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देण्यास कटिबद्ध आहे‘‘, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शंभर वर्षाच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा नाही, अशी अवस्था झाली आहे. ज्यांना डाकू, लुटेरे म्हटले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात कसला आला स्वाभिमान?, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारी म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देण्यास कटिबद्ध आहे‘‘, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शंभर वर्षाच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा नाही, अशी अवस्था झाली आहे. ज्यांना डाकू, लुटेरे म्हटले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात कसला आला स्वाभिमान?, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सांगली लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची संख (ता. जत) येथे बुधवारी (ता १७) सभा झाली. यावेळी खासदार संजय पाटील, पृथ्वीराज देशमुख, आमदार विलासराव जगताप, सुनील पवार, तमनगौडा पाटील, रवींद्र आरळी, श्रीपाद अष्टेकर, शिवाजीराव ताड, अजित पाटील, संजय कांबळे, आर. के. पाटील, सरदार पाटील, कविता खोत, रेखा बागेळी, मनोज जगताप, आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘जिल्ह्याचे नाव राज्यात पोहचविण्याचे काम वसंतदादा यांनी केले. त्याच्या कामाची पद्धत अनोखी होती. त्याच्या जन्मशताब्दी निमित्त कॉंग्रेसने एक ही कार्यक्रम केला नाही. त्यांच्या वारसांनी देखील काही केले नाही. वसंतदादा यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम आम्ही केला. त्यांच्या वारसांनी सोईची भूमिका घेतली.‘‘

‘‘म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यातील पश्चिम भाग ओलिताखाली आला आहे. आता पूर्व भाग लवकर ओलिताखाली येईल.जिल्ह्याने आम्हाला भरभरून दिले. आता आशीर्वाद हवा आहे. गल्लीची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे. गेल्या पंधरा वर्षात आघाडीच्या सरकारने सिंचनासाठी एका रुपयाचा निधी दिला नाही. त्यामुळे टेंभू ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजना अपूर्ण राहिल्या. या योजना पूर्ण करण्यासाठी बळीराजा सिंचन योजना आणि प्रधान मंत्री सूक्ष्म योजनाअंतर्गत पूर्ण केल्या. त्यामुळे योजना पूर्णत्वाकडे गेल्या आहेत. आघाडी सरकारने प्रस्थापिताना विस्थापित केले. आमचे सरकार आल्यानंतर विस्थापिताना प्रस्तापित केले,‘‘ असेही फडणवीस यांनी सांगितले.

जत तालुक्यातील मतदारांनी गेल्या निवडणुकीत संजय पाटील यांना जिल्ह्यातून मताधिक्य दिले. यावेळीसुद्धा संजय पाटील यांना गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

इतर ताज्या घडामोडी
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...