agriculture news in marathi, mhaisal irrigation scheme issue,sangli, maharashtra | Agrowon

म्हैसाळ योजनेचे पाणी वेळेत मिळेना
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 मे 2018

सांगली  ः म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू आहे. सध्या ७६ पंप सुरू आहेत. योजनेची १ कोटी ४४ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली आहे. शेतकऱ्यांना वेळेत पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभाग सक्षम नसल्याचे शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. योजनेचे पाणी वेळेत मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पैसे भरूनही पाणी मिळत नसल्याने शेतकरी आंदोलनाची तयारी करू लागले आहेत.

सांगली  ः म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू आहे. सध्या ७६ पंप सुरू आहेत. योजनेची १ कोटी ४४ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली आहे. शेतकऱ्यांना वेळेत पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभाग सक्षम नसल्याचे शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. योजनेचे पाणी वेळेत मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पैसे भरूनही पाणी मिळत नसल्याने शेतकरी आंदोलनाची तयारी करू लागले आहेत.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनची पाणीपट्टी भरा आणि पाणी घ्या, असे धोरण पाटबंधारे विभागाने हाती घेतल्याने, शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली. मात्र, पैसे भरूनदेखील पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणू लागले आहेत. तरीदेखील पाणी मिळत नसल्याने शेतकरी आता आक्रमक होऊ लागले आहेत.

मुळात, ज्या वेळी शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती, त्या वेळी पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले होते. मात्र, शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे आले नाहीत. थकबाकीमुळे ही योजना सुरू होईल का, असा प्रश्‍न होता. मात्र, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत ही योजना सुरू केली. त्यामुळे पाणी प्रश्‍न मिटला.

पाणी आल्याने शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे आले. पैसे भरले की, लगेच पाणी पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. मात्र, लगेच पाणी मिळणे कठीण आहे, पाणी उपलब्ध वेळाने होईल, अशी उत्तरे पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जत तालुक्‍यात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी दाखल झाले आहे. मात्र, हे पाणी मुख्य कालव्यांनी पुढे जाते आहे. या भागातील पोटकालव्यांची कामे झालीच नाहीत. त्यामुळे शेतीला पाणी कसे मिळणार असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करु लागले आहेत.

या योजनेचे पाणी मिळवण्यासाठी गेल्या आठवड्यात जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी एक दिवसाचे आंदोलन केले होते. मात्र, याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजना थकबाकीमुळे उशिरा सुरू झाली.

या योजनेचे पाणी जत तालुक्‍याच्या मुख्य कालव्यातून या तालुक्‍यातील लाभक्षेत्राला मिळते आहे. तसेच तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्‍यांत पाणी सुरू आहे. आजही पाणीटंचाई भासत आहेत. त्यामुळे या योजनेचे आवर्तन १० जूनपर्यंत राहण्याची शक्‍यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...