म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी सोडले 

सांगोला वितरिका क्रमांक दोनमधून वायफळ ते गावडेवाडीपर्यंत या १९ किलोमीटरपर्यंत सोमवारी (ता. १९) म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे सुमारे ५ हजार ८०० एकरक्षेत्रावरील शेतीला फायदा होणार आहे.
म्हैसाळ योजनेतून  सांगोल्यासाठी पाणी सोडले  From the Mhaisal scheme Released water for Sangola
म्हैसाळ योजनेतून  सांगोल्यासाठी पाणी सोडले  From the Mhaisal scheme Released water for Sangola

सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक दोनमधून वायफळ ते गावडेवाडीपर्यंत या १९ किलोमीटरपर्यंत सोमवारी (ता. १९) म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे सुमारे ५ हजार ८०० एकरक्षेत्रावरील शेतीला फायदा होणार आहे. 

म्हैसाळच्या या पाण्याबाबत सातत्याने मागणी होत होती. त्यानुसार हे पाणी सोडण्यात आले. गतवर्षी सांगोला वितरिका दोनमधून १५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते. या लाभक्षेत्रातील गावापैकी यंदा घेरडी गावाने पाण्याची मागणीच केली नाही.

या योजनेचा पोटकॅनॅाल १९ किलोमीटरचा आहे. गेल्यावर्षी या कॅनॅाल खराब झाला होता. त्यामुळे बरेचसे पाणी वाया गेले होते. हबिसेवाडी, पारे, काळेवाडी, हंगिरगे, गावडेवाडी या गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. या पोटकॅनॅाललाच हेड रेग्युलेटर बसवून बंदिस्त पाइपलाइन डिकसळ व पारे या गावासाठी आहे. तर पुढेही हंगिरगे-घेरडी फाटा क्रमांक एक व हंगिरगे-घेरडी क्रमांक सहा अशाही वितरिका आहेत. यातून घेरडी हद्दीतील देवकतेवस्ती व अन्य भागात पाणी दिले जाते.

सध्या उन्हाळी हंगामातील पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. एक दशलक्षघनफूट पाण्यासाठी यंदा ३० हजार रुपये इतकी पाणी पट्टी आकारण्यात येणार आहे. या पाण्यातून या भागातील सुमारे ५ हजार ८०० एकर क्षेत्राला लाभ होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com