म्हैसाळच्या पाण्यासाठी तलावातच ठिय्या

पाणी सोडण्याचा विषय समजून घेऊन वेळोवेळी आश्वासने देऊनही म्हैसाळ योजनेचे अधिकारी पाणी सोडत नसतील, तर ते चुकीचे आहे. आपण तोडग्यासाठी प्रयत्न करू. - डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर
म्हैसाळच्या पाण्यासाठी तलावातच ठिय्या
म्हैसाळच्या पाण्यासाठी तलावातच ठिय्या

भोसे, जि. सोलापूर : म्हैसाळचे पाणी शिरनांदगी तलावात सोडण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी तलावात सुरू केलेले ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच आहे.

आंदोलनाला आतापर्यंत जनहित शेतकरी संघटना, मंगळवेढा तालुका दलित पॅंथर संघटना, शिवबुद्ध युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य संकल्प महिला बहुउद्देशीय संस्था, विकास अपंग स्वयंसहायता समूह आदी विविध संघटनांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. समाज माध्यमात पाणी सोडण्याच्या आदेशाच्या बातम्या आल्या. मात्र प्रत्यक्षात पाणी कधी येणार, या प्रतीक्षेत या भागातील शेतकरी आहेत. त्यामुळे या आंदोलनाची धार वाढली आहे.

आसबेवाडी, मारोळी, बावची, चिखलगी, भोसे, रेड्डे, अहमदाबाद, हुन्नूर, जंगलंगी, पौट, सलगर खु., हुलजंती या भागातील शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले. पाणी सोडण्याबाबत निर्णय लवकर न झाल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. म्हैसाळ योजनेचे उपअभियंता राजेंद्र गाझी यांनी आंदोलकांची भेट घेतली. पदाधिकारी, अधिकारी भेट देत असले, तरी निर्णय होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com