म्हैसाळ योजना होणार चार दिवसांत सुरू 

म्हैसाळ योजना होणार चार दिवसांत सुरू 
म्हैसाळ योजना होणार चार दिवसांत सुरू 

सांगली ः ऐन उन्हाळ्यात तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेली म्हैसाळ उपसा सिंचन योजना चार दिवसांत सुरू होणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे ऑक्टोबरमध्ये आवर्तन सुरू करण्यात आले होते. ते पाच महिने सुरू राहिले. या दरम्यान योजनेतील सहा टप्प्यातील १५ पंप सुरू करून जतपर्यंत पाणी देण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे दुसऱ्या टप्प्यातील पंप बंद पडले. त्यामुळे ही योजना २ मार्चपासून बंद करण्यात आली. 

सुमारे १४४ दिवस सलग सुरू असलेल्या पंपाची देखभाल व दुरुस्ती केली नाही. त्यामुळे हा बिघाड झाला. पंपाची दुरुस्ती आणि आरग-बेडग व सलगरे मुख्य कालव्यांची गळती बंद करण्यासाठी, अस्तरीकरणाची कामे करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागेल, असे पाटबंधारे विभागाने सांगितले. अस्तरीकरण खराब झाल्याने लाखो लिटर पाणी वाहून जाते. 

आरग येथील तिसरा टप्पा आणि सलगरे व बेडग येथे पाच ठिकाणच्या मुख्य कालव्याची गळती काढण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाने सुमारे एक कोटीपेक्षा जास्त खर्चाच्या निविदा काढल्या. मुख्य कालव्याची गळती काढण्याचे काम ठेकेदाराला सोपवले. हे काम तीन आठवड्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, मात्र ते झाले नाही. आता हे काम चार दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली. त्यानंतर ही योजना सुरू केली जाणार आहे. 

तीन तालुक्यांतील १६४ तलाव भरणार  म्हैसाळ योजनेद्वारे सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी तीन तालुक्यांतील १६४ तलाव भरण्यात येतील. सिंचनासाठी पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांना पोट कालव्यातून पाणी दिले जाईल. योजना बंद कालवधीत मिरज तालुक्यातून सुमारे ६ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली अाहे, अशी माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com