agriculture news in marathi, mhisal irrigation scheme affected due to flood, sangli, maharashtra | Page 2 ||| Agrowon

म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्याला महापुराचा फटका
टीम अॅग्रोवन
रविवार, 8 सप्टेंबर 2019

सांगली   ः महिनाभरापूर्वी महापुराने कृष्णा नदीकाठ बाधित झाला होता. या महापुराचा कृष्णा नदीचे पाणी उचलून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात नेणाऱ्या महत्त्वाकांक्षी म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्यालाही चांगलाच फटका बसला आहे. पहिल्या टप्प्यातील मोठ्या विद्युत मोटारी, लहान मोटारी, पंप, पंपगृह, व्हॉल्व्ह फ्लोअर या सर्व ठिकाणी महापुराचे पाणी, चिखल आणि कचरा साचला होता. त्यामुळे आता पंपांची दुरुस्ती करावी लागणार आहे. ही दुरुस्ती करण्यास सुरवात केली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सांगली   ः महिनाभरापूर्वी महापुराने कृष्णा नदीकाठ बाधित झाला होता. या महापुराचा कृष्णा नदीचे पाणी उचलून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात नेणाऱ्या महत्त्वाकांक्षी म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्यालाही चांगलाच फटका बसला आहे. पहिल्या टप्प्यातील मोठ्या विद्युत मोटारी, लहान मोटारी, पंप, पंपगृह, व्हॉल्व्ह फ्लोअर या सर्व ठिकाणी महापुराचे पाणी, चिखल आणि कचरा साचला होता. त्यामुळे आता पंपांची दुरुस्ती करावी लागणार आहे. ही दुरुस्ती करण्यास सुरवात केली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महापुराला आता वीस दिवसांवर कालावधी लोटला असला, तरी पहिला टप्पा अजूनही पूर्णपणे दुरुस्त झालेला नाही. योजना कधीही सुरू करता येईल, पण त्यासाठी म्हैसाळ योजनेचा पहिला टप्पा सज्ज हवा. हा पहिला टप्पाच महापुराने बाधित झाला आहे. महापूर ओसरल्यावर १२ ऑगस्टपासूनच पहिल्या टप्प्यातील स्वच्छता आणि दुरुस्ती सुरू झाली आहे. पुरामुळे तळातील व्हॉल्व्ह फ्लोअरमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा साठला होता. पंपाच्या खाली लाकडी ओंडके आणि कचरा साठला होता. तो गाळ आणि कचरा काढण्याचे काम सुरू होते. चिखल वाळत जाईल तशी स्वच्छता करावी लागली. आता स्वच्छतेची कामे पूर्ण झाली आहेत.

दरम्यान, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल विभागाकडून दुरुस्तीची कामे सुरू आहेत. महापुरादरम्यान अगदी पंपफ्लोअरवरसुद्धा तीन फूट पाणी होते. त्यामुळे जॅक व्हॉल्व्हमध्ये लहान- मोठ्या विद्युत मोटारीत अस्वच्छ पाणी गेले. त्यामुळे त्या दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. ही कामे अजूनही चालूच आहेत. ही कामे संपल्यानंतर पहिला टप्प्यातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. दुरुस्तीस आणखी काही दिवस लागणार असून, तत्पूर्वी म्हैसाळ योजना सुरूच करता येणार नाही.

ऑगस्टमध्ये वारणा, कृष्णेला आलेल्या पुराचे पाणी सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागाला देण्याची मागणी जोर धरत आहे. खरे तर आता जरी सर्वत्र पाऊस झाला असला तरी तुलनेने पूर्वभागात पावसाचे प्रमाण अत्यल्पच राहिले आहे. या पार्श्‍वभूमीवर नद्यांच्या पुराचे पाणी कर्नाटकात विनावापर वाहून जात आहे. हेच महापुराचे पाणी सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागासाठी उचलून देण्याची संधी आली आहे. मात्र याच गरजेच्या वेळी  पंप दुरुस्तीसाठी बंद राहिले आहेत. अजून किमान पंधरा दिवस तरी हे पंप पूर्ववत सुरू होणे कठीणच आहे.

इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना...
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५०...नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे...
...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची...
किसान सभेकडून विमा कंपनीला २८...पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून...
हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत...आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि...
गूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना...कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी...
सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी...सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच...
कोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू...कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून...
जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...