agriculture news in marathi, mi shetkari campaign starts in state, nagar, maharashtra | Agrowon

राज्यात ‘मी शेतकरी’ अभियान सुरू : डॉ. अजित नवले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नगर  : शेतकऱ्यांचे प्रश्‍न निवडणुकीत मुख्य मुद्दे म्हणून केंद्रस्थानी आणण्यासाठी बुधवारपासून (ता. २) राज्यभर किसान सभा व शेतकरी संघटनांचे मी शेतकरी अभियान सुरू झाले आहे, असे अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. 

नगर  : शेतकऱ्यांचे प्रश्‍न निवडणुकीत मुख्य मुद्दे म्हणून केंद्रस्थानी आणण्यासाठी बुधवारपासून (ता. २) राज्यभर किसान सभा व शेतकरी संघटनांचे मी शेतकरी अभियान सुरू झाले आहे, असे अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला दीडपट हमीभावासाठी कायदा व डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या मागण्या केंद्रस्थानी आणण्यासाठी गावोगाव हे अभियान राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत गावांमधील पारावर, चावडीवर शेतकरी निवडणूक काळात ठिय्या देणार असून, प्रचारासाठी गावात येणाऱ्या शेतकरी विरोधी राजकीय पक्षांना शेतकरी प्रश्‍नांबाबत जाब विचारणार आहेत. 
सभा घेणाऱ्या पक्षांना शेतकरी कर्जमुक्ती व हमीभावाबाबत भूमिका मांडण्यास भाग पडणार आहेत.

बुधवारी अकोले (जि. नगर) येथे भव्य शेतकरी रॅली काढून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. सांगली, कोल्हापूर, बुलडाणा, अमरावतीसह राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी तथा तहसीलदारांना निवेदन देऊन हे अभियान सुरू करण्यात आले असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही...मुंबई : इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’...
डॉक्टर, कर्मचारी युद्धातील आघाडीचे...मुंबई : ‘कोरोना’च्या रुग्णांची सेवा करणाऱ्या...
अमरावती ‘झेडपी’चे पदाधिकारी देणार दोन...अमरावती : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव...
कारखानदारांनी कामगारांची सोय न केल्यास...कोल्हापूर  ः सर्व कारखानदारांनी त्यांचे काम...
नगर जिल्ह्यात रोज २६ लाख लिटर दूध संकलननगर  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तीन जिल्ह्यांतील ३९ मंडळात पावसाची...औरंगाबाद : एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव...
शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दूर करा ः विजय... नागपूर  ः कोरोना विषाणू नियंत्रणासाठी...
‘कृषी निविष्ठा विक्री केंद्र सम-विषम...परभणी ः कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर...
जळगाव जिल्ह्यात थेट बाजारासाठी शेतकरी...जळगाव ः ग्राहकांना दर्जेदार, आवाक्‍याच्या दरातील...
लासलगाव बाजार समितीचे कामकाज पुन्हा बंद नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे लासलगाव...
मेट्रो सिटीतील आऊटलेटमधून संत्रा विकानागपूर ः मदर डेअरी, एनडीडीबीच्या देशाच्या मुख्य...
पीककर्ज परतफेडीबाबत शेतकऱ्यांमध्ये...पुणे ः पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने परिपत्रक जारी...
परभणीत शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक परवाने...परभणी ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
सांगलीत भाजीपाला लावगडीकडे शेतकऱ्यांनी...सांगली : ‘कोरोना’च्या वाढत्या धोक्यामुळे आणि...
नांदेड, परभणी, हिंगोलीत वादळी पावसाने...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक...
गोंदिया जिल्हा बॅंकेची कर्जपरतफेडीस...गोंदिया ः ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर देशभरात...
कमी दरात काजू खरेदीचा काही दलालांचा...सिंधुदुर्ग ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
सोनुर्ली येथील स्वस्त धान्य दुकानाचा...चंद्रपूर : स्वस्त धान्य दुकानातील धान्याची...
सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जितेंद्र...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री...
मालेगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रे...वाशीम  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...