agriculture news in marathi To the micro food processing industry Will bring in the organized field | Agrowon

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना संघटित क्षेत्रात आणणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 मार्च 2021

औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना संघटित क्षेत्रात आणण्याच्या हेतूने पाऊल टाकले. केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना आणली गेली. या योजनेच्या अंमलबजावणीच्या हालचाली सुरू आहे.

औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना संघटित क्षेत्रात आणण्याच्या हेतूने पाऊल टाकले. केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना आणली गेली. या योजनेच्या अंमलबजावणीच्या हालचाली सुरू आहे. औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यातून विविध गटातील ८२ प्रस्तावाचा लक्षांक ठेवण्यात आला,’’ अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल जाधव यांनी दिली. 

डॉ. जाधव यांच्या माहितीनुसार, केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षादरम्यान एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जाणार आहे. लक्षांक असला तरी कितीही अर्ज आले, तरी स्वीकारले जाणार आहेत. या योजनेत राज्यातील कृषी व अन्न प्रक्रियेशी संबंधित सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे सक्षमीकरण, पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी बॅंक कर्जाशी निगडित अर्थ साहाय्य देण्यात येईल. 

वैयक्तिक लाभार्थींच्या उद्योग समूहाला एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्‍के किंवा जास्तीत जास्त १० लाख इतके बॅंक कर्जाशी निगडित अनुदान देय आहे. यामध्ये लाभार्थी हिस्सा किमान १० टक्‍के आवश्‍यक आहे. उर्वरित रकमेचे बॅंक कर्ज घेण्यास मुभा असेल. ब्रॅंडिग व बाजारपेठ सुविधेसाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्‍के अनुदान निधी क्रेडीट लिंक्‍ड कॅपिटल सबसिडी  या आधारावर अनुज्ञेय असणार आहे.  प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी होणारा खर्च १०० टक्‍के अनुदानावर मिळणार आहे. अनुसूचित जाती, जमाती व महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ प्राधान्याने मिळेल. 

स्वयंसहाय्यता बचत गटांना खेळते भांडवल व छोटी अवजारे खरेदीसाठी अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित कमाल दहा सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणूक भांडवल म्हणून फेडरेशनतर्फे प्रतिबचत गट ४ लाख किंवा प्रति सदस्य ४० हजार रुपये अनुदान देय आहे. 

एक जिल्हा एक उत्पादन या धोरणानुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी मका, जालना जिल्ह्यासाठी मोसंबी व बीड जिल्ह्यासाठी सीताफळ या पिकांची निवड करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेताना त्या त्या जिल्ह्यासाठी निश्‍चित केलेल्या पिकांवर प्रक्रिया उद्योगाचे प्रस्ताव तयार करणे अपेक्षित आहे. 

अर्ज सादर करावेत

वैयक्ति‍क लाभार्थ्यांनी http://pmfme.mofpi.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावे. वैयक्ति‍तीक लाभार्थी संज्ञेमध्ये संघटित क्षेत्रातील उद्योग असणे व त्यामध्ये १० पेक्षा कमी कामगार कार्यरत  असणे अपेक्षित आहे. कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयात याविषयी अधिक माहिती मिळू शकेल. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी संस्था यांनी ऑफलाईन पद्‌धतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत अर्ज सादर करावेत, अशा सूचनाही डॉ. जाधव यांनी केल्या.


इतर ताज्या घडामोडी
पूर्व भारताच्या विकासावर भर ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता,...
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पंढरपुरात...सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना...
बाजारात गर्दी नियंत्रणासाठी नियमांची...नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील...
नेरूर येथे नारळ बागेला आगसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेरूर कर्याद नारूर (...
जळगावात बीटी कापसाच्या २५ लाख पाकिटांची...जळगाव :  राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर...
दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात...अमरावती : सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून...
मंत्रिमंडळात विदर्भाचे वजन घटलेनागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय...
नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी...कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
अकोला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना...अकोला : एकीकडे केंद्र, राज्य शासन लाभार्थ्यांच्या...
दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन...परभणी : दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून...
शेतकरी नियोजन पीक ः डाळिंबसध्या बाग ताणावर सोडली आहे. मळद येथील ६० एकर...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
सोलापुरात वाढत्या उन्हामुळे शुकशुकाटसोलापूर ः सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
पणन संचालनालयाच्या सूचनांची काटेकोरपणे... नाशिक : पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन...
जलसाठा घटू लागला; ‘गिरणा’ ४७ टक्क्यांवरजळगाव : खानदेशात गेल्या काही दिवसांमध्ये रब्बी,...
कृषी सल्ला :आंबा, काजू, नारळ, वाल,...खरीप हंगामाच्या पिक लागवडीसाठी पूर्वतयारी म्हणून...
नाशिक : गोठेधारकांना परवाना नूतनीकरण...नाशिक : शासनाने ३१ ऑक्टोबर २००३ च्या...
वनशेतीसाठी उपयुक्त शिवणशिवण लाकडाचा उपयोग इंधन, फर्निचर, लॅमिनेटेड बोर्ड...