सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील उत्पादने निश्‍चित

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाच्या कालावधीत एक जिल्हा- एक उत्पादन (ओडीओपी) साठी राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी उत्पादने निश्चित करण्यात आली आहेत.
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील उत्पादने निश्‍चित
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील उत्पादने निश्‍चित

परभणी : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षाच्या कालावधीत एक जिल्हा- एक उत्पादन (ओडीओपी) साठी राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी उत्पादने निश्चित करण्यात आली आहेत. या उत्पादनांवर आधारित सार्वजनिक पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, ब्रॅंडिग आणि विपणन आदी बाबींसाठी या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

या अंतर्गत नाशवंत कृषी माल, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाला पिके, मांस प्रक्रिया, मत्स्यव्यवसाय, कुकुटपालन, दुग्धव्यवसाय, किरकोळ वन उत्पादने आदींचा समावेश आहे. सध्या कार्यरत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, उत्पादक सहकारी संस्था यांची पतवाढविण्यासाठी मदत केली जाईल.

उत्पादनांचे ब्रॅंण्डींग, विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित पुरवठा साखळीशी जोडले जाणार आहे. सध्या कार्यरत दोन लाख उद्योगांना निर्धारित रचनेमध्ये आणण्यासाठी अर्थसाहाय्य केले जाईल. सामाईक प्रक्रिया सुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठी सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक मिळवून देणे, या क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देण्यात येणार आहे.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया, उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न केले जातील. या योजनेत केंद्र -राज्य खर्चाचे प्रमाण ६०ः४० असे राहील. क्लस्टर आधारित व प्रामुख्याने नाशवंत मालावर आधारित राबविली जाईल. प्रशिक्षणावर भर दिला जाईल. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय समितीचे १२ सदस्याच्या समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष राहतील तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सदस्य सचिव राहतील. या अंतर्गत विविध राज्य तसेच केंद्र योजनांमधून एकत्रीकरण चा लाभ घेण्याची मुभा लाभार्थींना राहील. अनुसूचित जाती, जमाती, महिला, आकांक्षित जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येईल. वैयक्तीक लाभार्थींना एफएमई पोर्टलवर अर्ज सादर करावे लागतील.

एक जिल्हा-एक उत्पादन अंतर्गत जिल्हानिहाय उत्पादने जिल्हा...उत्पादने परभणी...गूळ हिंगोली...मसाले उत्पादने (हळद) औरंगाबाद...मका उत्पादने जालना...डाळ उत्पादने बीड...फळे भाजीपाला (सीताफळ उत्पादन) लातूर...भाजीपाला उत्पादने (टोमॅटो) उस्मानाबाद...कडधान्य उत्पादने (हरभरा) नांदेड...मसाला उत्पादने (हळद) ............................... मुंबई शहर...सागरी उत्पादने (मत्स्य व इतर) मुंबई उपनगर...सागरी उत्पादने (मत्स्य व इतर) ठाणे...भाजीपाला उत्पादने (भेंडी) पालघर..फळ उत्पादने (चिकू) रायगड...सागरी उत्पादने (मत्स्य व इतर ) रत्नागिरी...फळ उत्पादने (आंबा) सिंधुदुर्ग...फळ उत्पादने (आंबा) ........................ नाशिक...भाजीपाला व फळे उत्पादने (कांदा व इतर) जळगाव...फळे उत्पादने (केळी व इतर) धुळे...भाजीपाला उत्पादने (कांदा) नंदूरबार...भगर ....................... पुणे...भाजीपाला व फळपिक उत्पादने नगर...भाजीपाला व फळ पीक उत्पादने

सोलापूर..तृणधान्य उत्पादने (ज्वारी) कोल्हापूर...गूळ सातारा...गूळ सांगली...फळ उत्पादने (द्राक्षे) .................. अमरावती... फळे उत्पादने (संत्री) बुलडाणा..फळे उत्पादने अकोला...कडधान्य उत्पादने (तूर) वाशीम...तेलबिया उत्पादने (सोयाबीन) यवतमाळ...कडधान्ये उत्पादने (तूर) ........................... नागपूर...फळे उत्पादने (संत्री) वर्धा..डाळ उत्पादने भंडारा...भात-धान गोंदिया..भात-पोहा, मुरमुरा आदी चंद्रपूर...भात- पोहा, मुरमुरा आदी. गडचिरोली...किरकोळ वन उत्पादनेे 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com