उपजीविकेसाठी दुष्काळग्रस्त पुण्यात

उपजीविकेसाठी दुष्काळग्रस्त पुण्यात
उपजीविकेसाठी दुष्काळग्रस्त पुण्यात

पुणे ः ‘पाऊस अवकाळी झाला आहे. रान उदास झालंय, विहिरी-नद्या-नाले कोरडे झालेत. गवत वाळून चाललंय. उभी पिकं करपून जात आहेत. शेतकऱ्यानं कसं जगायचं... अशा व्यथा मांडत ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, रोजगाराच्या शोधात शहरात दाखल झाले आहेत. निदान शहरात तरी हाताला काम मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. ही संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे.  राज्यातील ३४ पैकी २२ जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात अनेक लोंढे शहरात येत आहेत. शहरात खडकी, शिवाजीनगर, कात्रज, स्वारगेट, हडपसर, कोथरूड, औंध, वारजे माळवाडी, पद्मावती आदी परिसरात तसेच शहरालगतच्या औद्योगिक वसाहतींमध्ये हे दुष्काळग्रस्त दिसत आहेत. मॉल, सिक्‍युरिटी गार्ड, केटरर्स, हॉटेलमध्ये मिळेल ते काम करून ते गुजराण करीत आहेत. त्यात थोडेफार शिकलेले तरुण वृत्तपत्रांमधील तसेच भिंतीवर चिटकवलेल्या जाहिराती न्याहाळत कामाच्या शोधात रस्त्यांवर दिसून येत आहेत. शहरात राहण्याचा प्रश्‍न असल्याने अनेक जण मिळेल तिथे पथारी टाकत आहेत, तर काही जण झोपडपट्टी-वस्त्यांमध्ये नातेवाइकांच्या आश्रयाने राहत आहेत. स्थलांतरामुळे अनेकांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा अर्ध्यावर सुटली आहे. त्यातूनही नवे प्रश्‍न त्यांच्यासमोर उभे राहिले आहेत.  पावसानं पाठ फिरविली अन शेतीही अडचणीत आली. म्हणून सोलापुरात एक हॉटेलात काम केलं. तथं पैसे मिळालं म्हणून पुणं गाठलं. रात्रपाळीत सिक्‍युरिटी गार्ड म्हणून लागलो. -अर्जुन सुकळे, शिवाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com