agriculture news in marathi Migration of 16,000 people in Pandharpur taluka | Agrowon

पंढरपूर तालुक्यात १६ हजार लोकांचे स्थलांतर

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

सोलापूर : अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने, नीरा व भीमा नदी काठी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सोलापूर : अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने, नीरा व भीमा नदी काठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागासह ४ हजार कुटुंबांतील १६ हजार लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.

पंढरपूर शहरासह तालुक्यातील ९५ गावे बाधित झाली आहेत. तालुक्यातील ३३०५ कुटुंबाच्या घरात पाणी शिरले आहे. अतिवृष्टीमुळे पंढरपूर शहरात ६, तर भंडीशेगाव येथील १ अशा सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ४४० घरांची पडझड झाली. ४ बंधाऱ्यांचे नुकसान झाल्याचेही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. 

शहरातील अंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी परिसर, लखुबाई मंदिर परिसर, केंद्रे महाराज मठ, सारडा भवन, तनपुरे महाराज मठ, लोकमान्य शाळा, चैतन्य महाराज मठ, गंगागिरी मठ तसेच पर्यटक निवास येथे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 

बचाव पथकाचे कार्य वेगाने

जिल्ह्यासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नदी पात्रात पाण्याचा प्रवाह मोठ्या तीव्रतेने सुरु आहे. नदी पात्राच्या काठावरील कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम प्रशासनाच्या व बचाव पथकाच्या मदतीने सुरु आहे. पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील तीन नागरिकांना वजीर रेस्क्यू फोर्सच्या मदतीने नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

कौठाळी येथून व्हाइट आर्मीच्या मदतीने नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, असे तहसीलदार वैशाली वाघमारे व गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...