सावली तालुक्‍यात धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

सावली तालुक्‍यात धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
सावली तालुक्‍यात धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

चंद्रपूर : सावली तालुक्‍यात धान (भात) पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. त्याची दखल घेऊन कृषी विभाग व कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी उपाययोजनांची शिफारस करावी, अशा सूचना आमदार विजय वडेट्टीवार यांनी केल्या.  

सावली तालुक्‍यात धान पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन वडेट्टीवार यांनी हरंबा परिसरातील पिकांची पाहणी केली. यावेळी कृषी अधिकारी त्यांच्यासोबत होते.

लष्करी अळीचे निर्मूलन करण्यासाठी सर्व कृषी अधिकारी व कृषी विद्यापीठ तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करावे, आवश्‍यक असलेली कीटकनाशके मोफत उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले.

 त्यासोबचत काही भागात रोवणीच्या वेळी पावसाने खंड दिल्याने गोसी खुर्द प्रकल्पातून पाणी सोडण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. त्यानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने पिकालादेखील जीवनदान मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com