Agriculture news in Marathi Milk Advisory Committee only on paper | Agrowon

दूध सल्लागार समिती कागदावरच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक दुग्धविकास आयुक्तालयाने घेतली नसल्याचे उघड झाले आहे. समितीचे अस्तित्व केवळ कागदापुरते ठेवण्यात कोणत्या अधिकाऱ्याचा हात आहे, अशी चर्चा आता डेअरी उद्योगात सुरू झाली आहे.

पुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक दुग्धविकास आयुक्तालयाने घेतली नसल्याचे उघड झाले आहे. समितीचे अस्तित्व केवळ कागदापुरते ठेवण्यात कोणत्या अधिकाऱ्याचा हात आहे, अशी चर्चा आता डेअरी उद्योगात सुरू झाली आहे.

दूध व्यवसायात राज्यातील लाखो शेतकरी गुंतलेले आहेत. त्यामुळे या व्यवसायाबाबत मंत्रालय किंवा सरकारी यंत्रणांकडून परस्पर निर्णय होऊ नयेत. निर्णय घेताना डेअरी उद्योगाचा सल्ला विचारात घ्यावा, असा आग्रह माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे डेअरी उद्योजकांनी धरला होता. ‘‘ही संकल्पना श्री.पवार यांना पटली. कॉंग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पाठिंबा दर्शविल्याने राज्यस्तरीय समिती स्थापन झाली,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

नागपूर जिल्हा नूतन दूध संघाचे चेअरमन म्हणून सुनील केदार या समितीत आहेत. ते स्वतः दुग्ध व्यवसाय विकासमंत्री आहेत. याशिवाय राजारामबापू सहकारी दूध संघाचे (ब्रॅन्ड- कृष्णा दूध) चेअरमन विनायकराव पाटील, संगमनेर दूध संघाचे (राजसंह) चेअरमन रणजितसिंह देशमुख, कोल्हापूर दूध संघाचे (गोकूळ) कार्यकारी संचालक दत्तात्रय घाणेकर, औरंगाबाद दूध संघाचे (देवगिरी महानंद) चेअरमन हरिभाऊ बागडे यांना समितीत स्थान दिले गेले आहे.

‘‘समितीने दूध उत्पादकांच्या मागण्या व समस्यांचा वेळोवेळी आढावा घेऊन शासनाला धोरणात्मक सल्ला देणे अपेक्षित होते. दुधाचे उत्पादन वाढावे, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळावा, खासगी व सहकारी प्रकल्पांमधील हितसंबंधांची जपणूक व्हावी, यासाठी समितीने दोन महिन्यांत एक बैठक घ्यावी, अशा शासनाच्या सूचना होत्या. मात्र, समितीची एकही बैठक होवू दिली गेली नाही. त्यामुळे खासगी व सहकारी डेअरीचालकांमध्ये नाराजी आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

खासगी उद्योगांचा सल्ला पोहचू नये म्हणून...
दूध व्यावसायिक सल्लागार समितीची बैठक न घेतल्यामुळे खासगी डेअरी प्रकल्पांना शासनाला सल्ला देण्याचा मार्ग बंद पाडला गेला आहे. ‘‘सोनाई दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथदादा माने, चितळे डेअरी समूहाचे अध्यक्ष श्रीपादराव चितळे, पराग (गोवर्धन) मिल्क उद्योगाचे अध्यक्ष प्रीतम शहा, कुतवळ फुडस् कंपनीचे (उर्जा दूध) अध्यक्ष प्रकाश कुतवळ यांना खासगी डेअरी उद्योगातील समस्यांची जाण आहे. तसेच, उपायांची देखील माहिती आहे. मात्र, त्यांचा सल्ला सरकारपर्यंत पोहोचू न देण्यासाठी आडकाठी आणली जाते आहे,’’ अशी सहकारी दूध संघाच्या वर्तुळातून सांगण्यात आले.

राज्यस्तरीय दूध व्यावसायिक सल्लागार समितीची बैठक का घेतली जात नाही, याविषयी डेअरी उद्योग बुचकळ्यात पडला आहे. या समितीचा विसर शासनाला पडला आहे. समितीचे कामकाज चालू ठेवले असते तर राज्यातील शेतकऱ्यांना दूधदराच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले नसते. कारण, समिती सदस्यांच्या अनुभवी सल्ल्यामुळे सरकारला प्रभावी उपाय लागू करता आले असते.
- प्रकाश कुतवळ, सदस्य, दूध व्यावसायिक सल्लागार समिती.


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...
निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ...अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले...
कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी...नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण...
पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही...
प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा :...नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार...
राज्यात १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे...पुणे: राज्यात यंदा जास्त ऊस उत्पादनाची शक्यता...
शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नावर तोडगा...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...