agriculture news in marathi, Milk agitation intensity increases in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात धग वाढतेय

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 जुलै 2018

सांगली : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ही दूध दराच्या मागणीसाठीचे आंदोलन सुरू होते. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील चार चिलिंग सेंटरवर संकलन झालेले दूध किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ओतले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन लगेच सोडण्यात आले. जिल्ह्यात दूध दराबाबत आंदोलनाची धग वाढू लागली आहे.

सांगली : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ही दूध दराच्या मागणीसाठीचे आंदोलन सुरू होते. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील चार चिलिंग सेंटरवर संकलन झालेले दूध किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ओतले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन लगेच सोडण्यात आले. जिल्ह्यात दूध दराबाबत आंदोलनाची धग वाढू लागली आहे.

जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) दूध संकलन करण्यासाठी चिलिंग सेंटर मालक फिरू लागले आहेत. जिल्ह्यात सकाळच्या टप्प्यात १ लाख ३८ हजार ९३८ लिटर इतके दूध संकलन झाले. तर मंगळवारी (ता. १७) दिवसभरात ६७ हजार ५०० लिटर दुधाचे संकलन झाले असल्याची माहिती शासकीय दूध संघाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात दूध संकलन होऊ लागले आहे. याची खबर शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांपर्यत पोचू लागल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते गनिमी काव्याचा वापर करून संकलन थांबवू लागले आहेत.

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील चिलिंग सेंटरवरील जमा झालेले दुधाचे कॅन आणि दूध घेऊन जाणाऱ्या गाड्या अडविण्यात आल्या. गाड्यातून कॅन काढून दूध रस्त्यावर ओतले. तर जिल्ह्यातील काही ठिकाणी दुधाचे वाटप करण्यात आले. आरग येथील दूध संकलन केंद्रात दूध आणू नका, असे निरोप शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले आहेत. वाळवा तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाय दुधाला प्रति लिटर पाचर रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, या मागणीसाठी मंगळवारी (ता. १७) मोर्चा काढण्यात आला. तर तासगाव तालुक्‍यात तालुक्‍यातून दूध संकलन पूर्णपणे बंद होते.
मंगळवारी (ता. १७) सिद्धेश्‍वर चौकात कार्यकर्त्यांनी दुग्धविकास राज्यमंत्री जानकर यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून घोषणा दिल्या.


इतर बातम्या
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...