Agriculture news in marathi Milk collection in bulldozers, Changes in delivery time | Agrowon

बुलडाण्यात दूध संकलन, वितरणाच्या वेळेत बदल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 एप्रिल 2021

कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाकडून सातत्याने नवनवीन निर्बंध घातले जात आहेत. नव्या नियमावलीत दूध उत्पादकांसाठी अयोग्य वेळा दिल्याने त्या बदलण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली.

बुलडाणा ः कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाकडून सातत्याने नवनवीन निर्बंध घातले जात आहेत. नव्या नियमावलीत दूध उत्पादकांसाठी अयोग्य वेळा दिल्याने त्या बदलण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली.

त्यानंतर नियमात बदल करून वेळा बदलून देण्यात आल्या आहेत.
शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ७ ते ११ या वेळेतच दूध संकलन आणि वितरणास परवानगी दिल्याने दूध उत्पादक शेतकरी व दूध डेअरी संचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार होते. हा अन्यायकारक आदेश रद्द करावा, अशी मागणी बुधवारी (ता. २१) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.

तुपकर यांनी तातडीने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी चर्चा केली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ही परिस्थिती अशीच राहिल्यास दूध उत्पादकांचे कंबरडे मोडेल, शिवाय रुग्ण, महिला, मुले व वृद्धांना यांनाही पोषक दुधाला मुकावे लागेल, ही बाब लक्षात आणून दिली. सायंकाळी दूध वितरणास परवानगी देण्याची मागणी रेटून धरली.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने २० एप्रिलच्या आदेशात बदल करीत जिल्ह्यातील दूध संकलन व वितरण केंद्र (दूध डेअरी) सायंकाळीदेखील ६ ते रात्री ८ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. सकाळी ७ ते ११ या वेळेनंतर आता सायंकाळी आणखी दोन तास मुभा देण्यात आली आहे. खेरीज घरपोच दूध वाटपाकरिता सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सवलत राहणार आहे.

  वेळेत बदल करणारा पहिला जिल्हा
सुधारित आदेश काढणारा बुलडाणा राज्यात पहिला ठरला आहे. दुधाबाबत आदेशात सुधारणा करण्याकरिता तुपकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी यासंदर्भात भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली.

  दूधाबाबतच्या आदेशात बुलडाण्यात पहिल्यांदाच सुधारणा
राज्य शासनाने जीवनावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. त्यामध्ये दूध संकलन व वितरणाचाही समावेश होता. मात्र, तुपकर यांनी या नुकसानकारक निर्णयात बदल करण्याची मागणी रेटून धरली. अखेर प्रशासनाला शासनाच्या आदेशात सुधारणा करावी लागली.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...