agriculture news in marathi, Milk collection in kolhapur district stopped due to agitation | Agrowon

कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद !
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 जुलै 2018

 कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे यासाठी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला सकाळी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक दूध संस्था आणि दूध संघांनी संकलन बंद ठेवून याला पाठिंबा दिला. गोकुळ दूध संघाने 11 लाख 50 हजार लिटरचे संकलन बंद केले. याला कोल्हापूरातील 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. सकाळी साडेनऊपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संकलन शंभर टक्के बंद राहिले. 

 कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे यासाठी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला सकाळी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सहा हजारहून अधिक दूध संस्था आणि दूध संघांनी संकलन बंद ठेवून याला पाठिंबा दिला. गोकुळ दूध संघाने 11 लाख 50 हजार लिटरचे संकलन बंद केले. याला कोल्हापूरातील 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. सकाळी साडेनऊपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संकलन शंभर टक्के बंद राहिले. 

कोल्हापूर जिल्ह्यातील गावा-गावात पहाटे चार ते पाच दरम्यान दूध संस्थांचा भोंगा (सायरण) वाजतो. यावेळी शेतकऱ्यांची गाय व म्हैस दूध काढण्याची लगबग सुरू होते. आज मात्र एकाही संस्थेचा भोंगा किंवा सायरण वाजला नाही. जिल्ह्यात गोकुळसाठी दूध संकलन करणाऱ्या 5 हजार 500 संस्था आहेत. तर, इतर संस्थांसाठी दिड ते दोन हजार संस्था आहेत. या सर्व संस्थांनी दूध संकलन बंद ठेवले आहे. कोल्हापूरातुनच सुरू झालेल्या दूध आंदोलनामूळे एक टॅंकर किंवा टॅंम्पो सकाळपर्यंत अडवलेला किंवा दूध रस्त्यावर ओतलेले दिसले नाही. 

काही घडामोडी...

  • कोल्हापूर : इचलकरंजीसह ग्रामीण भागात लोकांना मोफत दूध वाटप
  • वडणगे (ता.करवीर) येथे दूध संस्थानी संकलन थांबवल्याने नेहमी सकाळी उत्पादकांनी गर्दी असणाऱ्या संस्थेचे शटर सोमवारी(ता.16) सकाळी डाऊन होते

...... 
दूध बंद आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळाले पाहिजेत. यासाठी, गोकुळने आजचे सर्व दूध संकलन बंद ठेवले आहे. दूध संकलन बंद राहणार याबाबत दोन दिवसापूर्वीच सर्व संस्थांना कळविले आहे. 
- विश्‍वास नारायण पाटील 
अध्यक्ष, गोकुळ दूध संघ (कोल्हापूर) 

इतर अॅग्रो विशेष
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...
आबासाहेब झाले ग्लॅडिओलस पिकातील मास्टरअभ्यासू, तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेतीचे उत्तम...
दूध पावडर निर्यात अनुदान नाकारल्याने...पुणे : निर्यात केलेल्या दूध पावडरला प्रोत्साहन...
उर्वरित विमा रक्‍कम द्या देण्याचे...जामखेड, जि. जालना  : विमासंरक्षित रकमेनुसार...
सरपंच, उपसरपंचांचे  मानधन आता ऑनलाइन पुणे : राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांचे मानधन...
राजापुरात भातावर लष्करी अळीरत्नागिरी : राजापूर तालुक्यात परिपक्व झालेल्या...
मॉन्सून आज घेणार महाराष्ट्राचा निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आचारसंहितेची...सोलापूर : सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह २५...
‘ऑक्टोबर हीट’ने महाराष्ट्र तापला पुणे : पावसाच्या उघडिपीनंतर राज्यात ‘ऑक्टोबर हीट’...
फळबागा, मिश्रपिके, सिंचनासह शेती केली...मौजे रेवगाव (ता. जि. जालना) येथील अनिल व विनोद या...