परभणी येथे दूध संकलनातील घट सुरूच

Milk collection at Parbhani begins to decline
Milk collection at Parbhani begins to decline

परभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत परभणी येथील दुग्ध शाळेतील दूध संकलनात दर महिन्याला घट होत आहे. ती नोंव्हेंबर महिन्यातही सुरूच आहे. ऑक्टोबर  महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यातील दूध संकलनात १ लाख ३९ हजार १५४ लिटरने घट झाली आहे. गतवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमधील दूध संकलनात ८ लाख ६९ हजार ८२३ लिटरने घट झाली. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये ४ लाख ६० हजार ३६५ लिटर एवढे दूध संकलन झाले.

यंदा ऑगस्टमध्ये येथील दुग्ध शाळेत एकूण ९ लाख ७३ हजार ७१९ लिटर, सप्टेंबरमध्ये ७ लाख ७९ हजार ६३० लिटर, ऑक्टोबरमध्ये ५ लाख ९९ हजार ५१९ लिटर, तर नोव्हेंबरमध्ये ४ लाख ६० हजार ३६५ लिटर दूध संकलन झाले. नोव्हेंबरमध्ये येथील शितकरण केंद्रांमध्ये २ लाख ११ हजार ६६९ लिटर, पाथरी येथे  ६४ हजार ८९० लिटर, गंगाखेड येथे १ लाख ६ हजार १२ लिटर, हिंगोली येथे ४७ हजार १६ लिटर, नांदेड येथे  ३० हजार ७४७ लिटर दूध संकलन झाले. नोव्हेंबर महिन्यात हिंगोली आणि नांदेड वगळता अन्य ठिकाणच्या दूध संकलनात घट झाली.

शासकीय दुग्ध शाळेत गतवर्षी ऑगस्टमध्ये १० लाख १९ हजार ७८८ लिटर, सप्टेंबरमध्ये ११ लाख ७९ हजार १२४ लिटर, ऑक्टोबरमध्ये १ लाख ८३ हजार ४२ लिटरने वाढ होऊन एकूण १३ लाख ६२ हजार १६६ लिटर, तर नोव्हेंबरमध्ये १३ लाख ३० हजार १८८ लिटर दूध संकलन झाले होते.

दुग्ध शाळेला घातलेल्या दुधाची देयके दर दहा दिवासांनी अदा केली जाणे अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षात ती मिळण्यासाठी दोन ते तीन महिने उशीर होत आहे. 

नोव्हेंबरमधील तुलनात्मक दूध संकलन (लिटरमध्ये)

शीतकरण केंद्र २०१८ २०१९
परभणी  ४२८३०४ २११७०६
पाथरी ५५२०६४  ६४८९०
गंगाखेड १९०१२२ १०६०१२
हिंगोली १३३९४३ ४७०१६
नांदेड ०००  ३०७४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com